अजमेर लैंगिक गुन्हे एक दृष्टीकोन
अजमेर लैंगिक गुन्हे: एक दृष्टीकोन
अजमेर दर्ग्याचे खादीम म्हणजे समजण्याच्या भाषेत care taker, यांच्यापैकी सहा विकृत नराधमांना अखेर बत्तीस वर्षांनी जन्मठेप शिक्षा सुनावली गेली. म्हणजे शिक्षा जाहीर करण्याचा सोपस्कार पार पडला. यांच्या वरील आरोप हे अत्यंत गंभीर स्वरुपाचे व मानवतेने लाजून थिजून जावे अशा स्वरूपाचे होते. शंभरहून अधिक महिलांचे बदनामी करून लैंगिक शोषण केले गेले. स्त्रीची अब्रू वेशीवर टांगली गेली. गुन्हा वैयक्तिक विकृतीचा नव्हता तर सामुहिक विकृतीचा होता. व भरीस भर त्यात एक अजून जालीम नशा पण होती.
म्हणून हा विषय भारतासाठी, हिंदूंसाठी समजावून घेणे अधिक आवश्यक ठरते. कोणताही बलात्कार, लैंगिक शोषण हे घृणास्पद आहेच पण या प्रकरणात ते अन्य काही कारणांनी अधिक विकृत व अधिक दखल घेण्या योग्य आहे.
यातील सहाही आरोपी साधे गुन्हेगार नाहीत तर दर्ग्याच्या खादिमांमधील आहेत. म्हणजे विश्वस्त घरातील आहेत. दर्ग्याचे मजहबी मालक आहेत. तेथे येणारा चढावा हा या जातीतील लोकांच्या पायाशी ओतला जातो व ते हा पिसाटपणा करत होते. सगळे चिस्ती व सुफी नराधम होते. यांच्या जाती, दर्ग्याशी नातं व दुर्दैवी महिला यांचा संबंध शोधला की भारतीयांच्या मनातील अनेक संभ्रम दूर होतील व हिंदू समाजाला नागडं सत्य पहाता येईल.
पहिली गोष्ट सुफी म्हणजे काही तरी सेक्युलर, इस्लामच्या विकृती वरील उत्तर, भक्ती मार्गी हा जो भ्रम निर्माण केला आहे तो दूर करून घेऊ या. सुफी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इस्लामच्या सर्व विकृतींनी तसाच भरलेला एक अल्लाहला मानणारा पंथ आहे. इतिहास तर साक्षीदार आहेच. पण या दर्गा भानगडी प्रकरणातही शंभरावर स्त्रीया अन्यायग्रस्त असूनही सर्वांचा दोष एकच आहे तो म्हणजे त्यांची ओळख हिंदू ही आहे. फक्त लैंगिक विकृती असती तर ओळखीपाळखितील लैंगिक विकृतांच्या स्वधर्मीय रुपवती महिला त्या अन्यायग्रस्त यादीत सापडल्या असत्या. पण तसे घडले नाही कारण ह्या विकृतांना फक्त लैंगिक शोषण करायचं नव्हत तर ते मजहबी पुण्य कृत्य म्हणून करायचे होते.
तसेच सर्व नावे ज्या खादिमांशी निगडीत आहेत त्यांनी कोणता निषेधाचा सुफी आलाप गायला? सत्य हेच आहे की औरंगजेबा सारख्या मजहबी विकृताच्या घडवण्यात सुफी संत (?) ही होता. त्यामुळे सुफी म्हणजे वेगळे काही नाही. तोच इस्लाम, तोच अल्लाह, तोच प्रेषित, तेच कुराण ह्या पंथाचे मार्गदर्शन करतो. शत्रूच्या स्त्रीया ही लूट आहे हे शिकवतो. शत्रू कोण तर मूर्तीपूजक. म्हणजे हिंदू. व म्हणून विकृत सर्व एका नावाचे व शोषित सर्व मूर्ती पूजक. या पंथाचे इमान महत्वाचे न की आधुनिक मानवी मूल्ये.
म्हणून ही गुन्ह्याची साखळी बनली आहे. अजमेरचे गुन्हेगार काय गुन्हा करतात हे महत्त्वाचे नाही तर हिंदूंसाठी, देशासाठी, संविधानासाठी, महत्वाचे हे आहे की अजमेरचे गुन्हेगार हे गुन्हे का करतात. ह्या का चे उत्तर मिळाले की गुन्हे थांबतील व समाजच ते थांबवेल.
अजमेर दर्गा गुन्ह्यात पोलिस काय चुकले? न्यायालय विलंब, कॉँग्रेसचे संबंध, मानसिक विकृती, प्रशासन असे अनेक मुद्दे असतील, नव्हे आहेतच पण ते मूळ नाही तर देशाने मुळाशी जाऊ नये म्हणून केलेल्या मलमपट्टी तक्रारी आहेत. पण निखळ, नागडं सत्य हेच आहे की इस्लामी पंथांच्या जडणघडणीतील ज्या विकृती पवित्र म्हणून सांगितल्या गेल्या आहेत, त्या विकृत वर्तनाला पंथच ७२ हुरांचे बक्षीस लावतो, इमान हे नागरी सद् वर्तना विरुध्द वर्तन करण्याची प्रेरणा देतो त्या इस्लामला जो पर्यंत आधुनिक नागरी नैतिकतेच्या कह्यात आणले जात नाही तो पर्यंत सह अस्तित्व अशक्य व म्हणून हिंदू महिलांवरील अत्याचार थांबवणेही अशक्य.
म्हणून अजमेर येथील महिला लैंगिक शोषण ह्या गुन्ह्याकडे प्रामुख्याने हिंदू समाजाने, संपूर्ण देशाने वरील दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे व जागृत कृतिशील बनले पाहिजे. प्रशासन, सरकार, पोलिस, न्यायालये सर्वांना धारेवर धरले पाहिजे व भारता पुरते तरी इस्लामच्या पवित्र ग्रंथांमधून मूर्ती पूजा द्वेष, सह अस्तित्व नाकारणा-या आयातीवर पूर्ण बंदी आणली पाहिजे.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment