अन्वयार्थ
अन्वयार्थ
महाराष्ट्रातील निवडणुकीत मतदान झाले आहे व अता निवडणूक निकालाची धामधूम चालू आहे. भाजप प्रणीत आघाडी प्रचंड बहुमताकडे वाटचाल करीत आहे. व सामान्य माणसाला मिडीयाच्या निर्बुद्ध प्रचारामुळे जी भिती वाटत होती ती पूर्ण खोटी ठरली.
हिंदू हित हा या निवडणुकीचा मध्यवर्ति मुद्दा होता. तो प्रचारात समजत होता. सर्व प्रकारच्या जिहाद मुळे व तो जनतेला पटवून देण्यात कार्यकर्त्यांना यश आल्यामुळे ही प्रचंड गाजलेली निवडणूक एकतर्फी झाली. या निकालाचा जो अर्थ सांगितला जाणार नाही तो आपण समजावून घेऊ यात.
हिंदू सामाजिक कार्यकर्त्यांना जी गोष्ट पहिल्या पासून माहिती होती ती यावेळी निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी आली. मुसलमान हे नेहमी इस्लामचे प्यादे म्हणूनच राजकारण करतात. म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला सुध्दा ते मत देतात. हिंदुत्ववादी विचारधारा खरी कोणती हे त्यांना सर्वात नीट परिचित असते व म्हणून त्या विचारधारे विरुद्ध जे कोणी त्यांना मुसलमान मदत करतात. पण या वेळेस प्रथमच भाजपचे शीर्षस्थ नेतृत्व उघडपणे ही वस्तुस्थिती स्विकारुन कामाला लागले व व्होट जिहाद हा शब्द निवडणूक रिंगणात आला. मुसलमान हा फक्त व फक्त इस्लामचा इमानदार असतो हे सत्य आज सर्व महाराष्ट्रातील जनतेने स्विकारलेले पाहिला मिळाले.
हिंदू संघटनांना जे अपेक्षित होते की ८५% समाजाला गृहित धरून १५% चा अनुनय करणे अता चालणार नाही. श्री बाळासाहेब देवरस यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी केलेल्या घोषणेला २०१४ पासून मुर्त रूप येत आहे. तो घोषवाक्य होते हिंदू हिताला मत. म्हणजे राजकीय परिभाषेत याला म्हणू या ८५% चे राजकारण. आज त्याचे फलित महाराष्ट्रात आपण पहात आहोत.
वक्फ, जिहाद, औरंगाबाद चा पुरस्कार, अहिल्यादेवी नावाचा तिरस्कार हे सर्व हिंदू समाजाने मुस्लिम अनुनयाच्या सदरात टाकले. बटेंगे तो कटेंगे याचा अर्थ हिंदू समाजाने नीट समजून घेऊन फाळणी, काश्मिरी हिंदू या सर्वांशी जोडून घेतला व हिंदू हिताला मत टाकले. छत्रपति शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे यांचा सत्य इतिहास गड जिहाद निमित्ताने पुढे आला.
निवडणुकीत एकतर्फी विजय होण्यासाठी भावना व व्यवहार एकत्र यावा लागतो. यावेळी तो आला. नीट राबवलेली लाडकी बहिण, अटल सेतू, महामार्ग या कामांबरोबरच हिंदू ध्येयवादाने भारलेले वातावरण हे एकत्र आले व निवडणुकीचा निकाल लागला.
सर्व जातीतील समाज हा हिंदुत्वाच्या मुख्य धारेशीच जोडलेला आहे हे राष्ट्रीय सत्य महाराष्ट्रालाही लागू आहे हे सत्यही या निवडणुकीमुळे स्पष्ट झाले.
अन्वयार्थ लावताना अजून एका गोष्टीचं विश्लेषण आवश्यक आहे. जरांगेंची सोबत मराठा समाजाने का सोडली? लोकसभेवेळी सुध्दा जरांगेचे आदेश पाळणारा मराठवाड्यातील मराठा समाज का बिथरला? जरांगेंनी ज्या क्षणी मुस्लिम अनुनय सुरु केला? औरंगजेबाला मानणा-या जलीलला गळा मिठी झाली, मुल्ला मौलवी भेटी गाठी सुरू झाल्या व हिंदू मराठा समाज बिथरला. संभाजी महाराज की औरंगजेब हा प्रश्न उपस्थित झाला तो सर्व हिंदुंनी विचारला व त्याचे उत्तर म्हणजे मराठवाड्यातील निकाल होत.
माझ्या मते महाराष्ट्र निवडणुकीचा हा अन्वयार्थ आहे.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment