डोनाल्ड ट्रंपचा विजय

अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी डोनाल्ड ट्रंपचा विजय होत आहे. तसे अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी कोण विजयी होतो याने मला फारसं आनंद वा दु:ख होण्याचं कारण नाही. कारण माझ्या रोजच्या जगण्याशी त्याचा तसा काही संबंध नाही.पण अमेरिकेत राष्ट्रवादाचा उघड पुरस्कार करणारा माणूस निवडून आला आहे. याचा मात्र मला फार आनंद झाला आहे. राष्ट्रवाद म्हणजे काही तरी मानवता विरोधी असा भ्रम असणा-यांना अमेरिकन जनतेने चांगले प्रत्युत्तर दिले आहे. कितीही अफ्रिकन, व अन्य देशीय नागरिक आले तरी अमेरिकन राष्ट्रवाद हा तेथील गो-यांच्या सांस्कृतिक कल्पनांप्रमाणेच चालला पाहिजे. ट्रम्पच्या संभाव्य विजयात मला आनंद होण्याचे पहिले कारण हे आहे की हा अमेरिकन राष्ट्रवादाचा विषय आहे. आंतरराष्ट्रीय पोलिस गिरी करून देशाला अडचणीत आणणा-या भूमिका सोडून माझ्या देशाचे हित एवढेच आंतरराष्ट्रीय राजकारण ही भूमिका मांडण्यावर भर देणारा उमेदवार अमेरिकेला मिळाला.

मला आनंद होण्याचे दुसरे कारण म्हणजे राष्ट्रवाद हा अमेरिकन निवडणूकीच्या केंद्र स्थानी नको म्हणून एखादी काळी व्यक्ति गेली तर ते देश पेटवण्यासाठी कारण बनवणे, उमेदवार टिंगलीचा विषय बनवणे, मानवताविरोधी चित्रित करणे व त्याचे गंभीर कार्य दुर्लक्षित करणे, जेणे करून राष्ट्र संक्लपना लोकमान्य नाही असा देखावा उभा करणे हे सर्व यावेळी अमेरिकेन नागरिकांनी उधळून लावले. सोरेस, ग्रेटा व तत्सम टूलकिटस यावेळी अमेरिकन नागरिकांनी उधळून लावली.
तिसरे ट्रम्प यांनी अमेरिकेसाठी सर्वात मोठी गोष्ट केली ते अफगाणिस्तान मधून सैन्य मागे घेतले. ज्यू जावयाच्या मदतीने सौदी अरेबिया व इस्त्रायल मध्ये अब्राहामिक order सारखा करार केला. North Korea सारख्या hostile नेतृत्वाशी टेबलावर चर्चा केली. व ह्याचे महत्व आज अधोरेखित झाले. काही भारतीयांसकट अनेकांना ट्रम्प विदुषक व American maturity चा अपमान वाटत होता , त्यांचाही भ्रमनिरास झाला, जो आवश्यक होता.
एक कारण अजून, व जाता जाता. भारतातील विचारवंत नावाच टुलकिटही सणसणीत तोंडावर आपटले.

अमेरिकेच्या जागतिक पोलिसगिरीला दूर करून अमेरिकन राष्ट्रवादाच्या मदतीने अमेरिका प्रगतीशील रहावी अशी सदिच्छा व्यक्त करतो.

सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन