Operation सिंदुर

मैदानावरचे युद्ध ही सुरवातही नसते व शेवटही नसतो. तर दीर्घकालीन घटनांच्या साखळीचा तो परिणाम असतो. Operation Sindoor हे सुध्दा १९४७ ची फाळणी, काश्मीरमधून हिंदूंचे निष्कांसन, २६/११, गोध्रा, संसदेवरील अतिरेकी हल्ला, थोडक्यात गाव तिथे बाॉंबस्फोट, अर्थात इस्लामी आतंकीचा परिणाम म्हणजे operation Sindoor. म्हणून operation Sindoor ही एक continuous process आहे.
म्हणून operation Sindoor समजून घेताना युध्द हे भारत पाकिस्तान अशा देशांमध्ये नव्हते कारण इस्लाम देश संकल्पनाच मानत नाही तर हे युध्द हे दारुल इस्लामचे दारुल हरबवरचे आक्रमण आहे. सह अस्तित्व नाकारणा-या इस्लामचे मुर्तीपूजक हिंदू नष्ट करण्यासाठी आक्रमण आहे. त्यासाठी पहलगाम मधील हिंदू हत्याकांड झाले आहे.
म्हणून हिंदू, म्हणजे भारतीयांनी हे युद्ध समजून घेतले पाहिजे की हे युध्द बतावणी होते तसे geo political कारणाने नाही, अमेरिकेमुळे नाही, चीनमुळे नाही, बाजारपेठी लालसा पूर्ण अर्थ कारणाने नाही तर फक्त इस्लामिक विकृत एकारलेपणामुळे होत आहे. व होत रहाणार आहे. कोणीही हिंदूने फसू नये की युध्द व अतिरेकी कारवाया याला इस्लाम शिवाय अन्य कोणी जबाबदार आहे. जसे लव्ह जिहाद मध्ये मेरा अब्दुल वैसा नहीं हे मुर्खपणाचे आहे तसेच इस्लामिक हिंदू द्वेषातून होणा-या अतिरेकी कारवायांना अमेरिका, चीन, बाजारपेठ, Geo political, यांच्या माथी मारणे चूक होईल.

प्रत्यक्ष युध्द हे माध्यमांमुळे सर्वांचं घरबसल्या खेळून झाल आहे.
पण प्रत्यक्षात भारतीय म्हणून, समाज म्हणून आम्हाला वेगळेच काहीतरी समजून घेणे आवश्यक आहे. उरीच्या आधीच्या सर्व अतिरेकी कारवाया नंतर हिंदू समाज सरकारी निष्क्रियतेमुळे हताश असायचा

पण उरी पासून परिस्थिती पालटली.
पण बदलले काय? 
*जनतेशी नाळ असलेले नेतृत्व आले. म्हणजे मी कृति करेन ही जनतेला आपली वाटेल का? याचे उत्तर हो आले. 
जगाला काय वाटेल हे नाही तर जनतेला काय वाटेल हे समजणारा नेता आला. हा तो बदल आहे.
यासाठी जनता म्हणून आपली व नेता म्हणून मोदींची पाठ थोपटू या.
उरी, ३७० जाणे, व अता पहलगाम हे सुरक्षा संदर्भात पण inclusive economy चे यश हे पण यातच येते.
त्यामुळे जनतेला खात्री होती आपण काही तरी करणार. व नेतृत्वाला खात्री होती प्रतिघातासाठी समाज आसुसलेला आहे.
समाज संघटित व क्रियाशील म्हणून मोदी नेतृत्वपदी हे ते प्रमेय आहे जे आपण समजून घेतले पाहिजे.
प्रतिशोधाची ही पार्श्वभूमी.
अशा वेळी युद्धबंदी जाहीर झाली व देशभक्त भारतीय जरा निराश झाला. ज्याच्या वर भरवसा त्या नेत्याने अमेरिकेसमोर नांगी टाकली? असा एक अभासी दृष्टिकोन निर्माण झाला. व या दृष्टीने जेवढ्या बारकाईने पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाचे विश्लेषण व्हायला हवे होते तेवढे अजून झाले नाही..
म्हणून हे अजून एक चर्वितचर्वण.
एक देशाला दिशा देणारे, मूलभूत भूमिका सुस्पष्ट करणारे, सामान्य मनातील सर्व शंकाना स्पर्ष करणारे, जगाला जाणीव करून देणारे असे सर्व एकत्र असलेले एक मुत्सद्दी कुटनितीज्ञाचे भाषण म्हणून हे एक मैलाचा दगड ठरणारे भाषण आहे.
पूर्व सुरीच्या भुमिकांपासून पूर्ण फारकत घेतलेली भूमिका या भाषणात मांडली गेली आहे. आतंकवादाविरुध्द zero tolerance म्हणजे फक्त निषेध नाही तर त्याचा पूर्ण बिमोड ही भूमिका व तेवढीच भूमिका मांडली व फक्त भाषणात नव्हे तर कृतितून. प्रथम उरीमध्ये एअर स्ट्राइक व यावेळचे दुस-या देशात घुसून अतिरेकी स्थान नष्ट करणे.
यातून व या वेळच्या भाषणातून संदेश स्पष्ट दिला की आमच्या लोकांच्या रक्षणासाठी दुस-या देशाच्या सार्वभौमत्वाचा घास घेण्यास भारत मागे पुढे पहाणार नाही, मग जग युद्धखोर म्हटल तरी चालेल. ही भूमिका कूटनिती म्हणून एवढी महत्वाची आहे की पाकिस्तानला युध्द विराम झाला तरी उद्या काय होईल हे भय कायम राहिलं आहे.
या बरोबरीने आम्ही उगाच आक्रमकवादी नाही तर जेवढे उद्दिष्ट तेवढीच कृति हे भाषणातून अधोरेखित केले व हीच भारत जीवन दृष्टी आहे हेही बरोबर बौध्द जयंति दिवशी तथागतांचा उल्लेख करून अधोरेखित केले .
त्याच बरोबर समाज रक्षणासाठी कोणत्याही स्तरावर जाणार हे एवढ्या जोरात सांगितले की जणू काही पाकिस्तान व पूर्ण जगाला सुद्धा धमकी वाटावी अशी समज दिली. त्यासाठी शब्द योजनाही अचूक होती. Terror & Talk, व खून व पाणी एकत्र वहाणार नाही असे सांगून सिंधू करार तुटला हे स्पष्ट केले. न्युक्लिअर black mailing खपवून घेणार नाही हा संदेश वा धमकी सर्व विकसित जगाला दिली.
त्यांच्या कूटनीतिपूर्ण भाषणातील सर्वात शक्तिशाली वाक्य ही न बोललेले मौन होते. अमेरिका व चीन या बड्या राष्ट्रांना अनुल्लेखाने मारले. हे आक्रमण आम्ही थांबवले कारण पाक शरण आला व आमचे इप्सित कार्य पूर्ण झाले म्हणून. कोणी मध्यस्ती केली म्हणून नाही.
या युध्दमय वातावरण व समाजातील एकात्मिक जोशाचा फायदा घेऊन पाकिस्तान व जगाला सांगितले की पाकिस्तान बरोबर बोलणी फक्त दहशतवाद व पाक व्याप्त काश्मीर या वरच होणार व कोणाही मध्यस्ता विना होणार. म्हणजे पाकिस्तानला जगाचा काही उपयोग नाही हे स्पष्ट करुन टाकले.
भारताच्या शस्त्रसज्जतेची अधिकृत व्यासपिठावरून जाहीर वाच्यता केली. व आक्रमकता ही आमच्यासाठी संकट नसून संधीच असणार हे ही सांगून टाकले.
व सर्वात महत्वाची गोष्ट केली की यापुढे दहशतवादी कृत्य घडले तर ते दहशतवादी व त्याला पाठबळ देणारे सरकार, देश यांना आक्रमण समजून कोणत्याही थराची कारवाई केली जाईल.

फक्त २०/२२ मिनिटांच्या भाषणात पहलगाम घटनेचं दु:ख पिडा , समाजाच्या मनातील मरगळ घालवून, पाकिस्तानला धमकी, जगाला समज दिली. Operation Sindoor is a continuous process हे ही स्पष्ट केले. तसेच भारतातील झारीतील शुक्राचार्यांनासुध्दा अनुल्लेखाने मारले.
व फार महत्वाचे म्हणजे या कृतीचे नाव सिंदुर ठेवले एवढेच नाही तर सिंदुर ही हिंदू संकल्पना जी आहे, त्या अर्थानेच वापरलेली आहे, हे ही स्पष्ट केले.
म्हणून या भाषणावर खूप अधिक विचार व्हायला पाहिजे. किलोचित परिवर्तनाला तयार भारत हा नव भारत आहे हे भारताच्या कृतितून कळत आहे. ते फक्त देशभक्ती नाही, ते फक्त आतंकवाद विरोधी नाही, ते फक्त तात्कालिक नाही, ते फक्त made in India नाही तर हे सर्व मिळून आहे. व फक्त सरकार नाही तर तर संपूर्ण समाजाच्या चैतन्याचे प्रतिक आहे म्हणून हे भाषण एवढे महत्वपूर्ण आहे. समाज, देश व नेता यांच्या एकत्रित चिंतनाचे प्रतिक आहे. म्हणून चैतन्यमय व शक्तिशाली आहे.
जगभरातील नेतृत्व यात फक्त अमेरिका पाहू. आज एक, उद्या दुसरं व नंतर सपशेल माघार. कारण मोदींचे वरील भाषण.
 फ्रान्स ज्यांनी राफेल विकले होते ते भारताची भूमिका मान्य पण जरा आवरते घ्या. जवळपास सर्व जग काठावरुन आपल्या बरोबर. हा कूट नितीचा विजय. पाकिस्तान बरोबर तुर्क, अझरबैजान, चीन व मलेशिया. हे भारत विरोधात. पण भारत सरकार काही न बोलता सामान्य नागरिकांनी बहिष्कार शस्त्र उगारून आपली भूमिका सुरू केली. हे नेतृत्व व जनमत यातील तादात्मता सांगते.
इस्लामिक बंधुभाव हा अता चेष्टेचा विषय झाला आहे. 
या युध्दात सर्व भारत नेहमी प्रमाणे एक दिसला. जसे शशी थरूर, ओवेसी.
खूप कालखंडानंतर आपण मैदानातील विजय हा सारीपाटावरही कायम राखला.

सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन