भारताची व्यूहरचना हिंदू जीवनादर्शाचे यथार्थ दर्शन

भारताची व्यूहरचना यथार्थ हिंदू जीवनादर्शाचे मनोहर दर्शन 

पहलगाम येथील घडलेल्या इस्लामिक कौर्याविरुध्द भारतीय जनमत उद्विग्न, संतप्त झाले आहे. इस्लामिक कौर्याया कळणा-या प्रतिशोधाची अत्यंत आवश्यकता होती. सौभाग्यवश सर्वोच्च नेतृत्व हे जमिनीशी नाळ जोडलेल असल्याने जनभावना हीच सरकारची भूमिका असे स्वरूप निर्माण झाले आहे. व त्यामुळे पहलगाम व तत्सम सर्व इस्लामिक क्रूर आतंकवादाला सडेतोड उत्तर मिळणार याची खात्री होती.

पण ह्या भावनिक प्रसंगीसुध्दा भारत, भारतीय नेतृत्व व लष्कर हे हिंदू जीवनादर्श विसरले नाहीत. पहलगाम हे इस्लामिक आतंकवादाचे उदाहरण असल्याने भारताने आपली कृति दहशतवाद विरोधापुरती मर्यादित ठेवली. जो गुन्हा त्यासाठी शिक्षा. द्वेष हा कधीच कृतिचा आधार होऊ दिला नाही. सर्व जगाला भारतीय शौर्य व सुसंस्कृतता याचे एकत्र दर्शन झाले. विना अट सर्व जगाने भारतीय कृतिचे समर्थन केले.

तर दुसरीकडे पाकिस्तान ज्यांचा जन्मच द्वेषमूलक विचाराने व तत्वज्ञान म्हणून मागास, विकृत इस्लाम यांच्या स्वाभाविक वर्तनाचा अनुभवही जगाने घेतला. पुंछमध्ये सामान्य नागरिकांवर लष्करी आक्रमण करून अनेक निरपराध नागरिकांना यमसदनी पाठविले.
जगाला न्याय संगत सहजीवन फक्त हिंदू विचारधारा व व्यवहारच देऊ शकतो हे या युध्द परिस्थिती मध्ये समजले.
पण हिंदू न्यायसंगत वर्तन करतो. भारताच्या नागरी जीवनावर आक्रमण मात्र तसेच प्रत्युत्तर देत आहे. व तरीही सामान्य पाक नागरिक भारताच्या संतापाचे बळी पडलेले नाहीत. पण जर त्यांनी स्वतःच्या बेजबाबदार सरकार व लष्कराला जाब विचारला नाही तर मात्र हिंदू भारत हेही जाणतो की इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा.
हे सर्व operation Sindoor  म्हणून हिंदू जीवनादर्शाचे दर्शन घडवित आहे. जग वैश्विक सहजीवनासाठी ज्या न्याय्य, संयत व विकृतीहीन कृतिची वाट पहात आहे, ते भारत आज घडवत आहे. 
भावनिक तरीही संयत, आक्रमक तरीही न्यायसंगत व फक्त विकृतीचे दमन.
प्रतिशोधाचा आनंद आहेच, विजयाचा अभिमान तर आहेच पण या परिस्थितीतही न्यायाचा तराजू जराही डळमळीत होऊ न देण्याची न्याय निष्ठूर तत्वज्ञ भूमिकाही ढळलेली नाही.
म्हणून युध्दातली भगवत गीता आजही भारत सांगत आहे.
विजयी भारत, विजयी हिंदू म्हणून अश्वस्त विश्व.

सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन