कशाचा आनंद?
JNU ही तशी राष्ट्रवादी सामान्य जनांसाठी notorious संस्था म्हणून प्रसिद्ध होती. सरकारी पैशावर राष्ट्र, संस्कृती याच्यावर हल्ला करणारी बांडगूळ पोसण हा गोरख धंदा ते कायम चालू होता.
पण जरा ताठ मानेने विचारांवर चालणारे सरकार आल्यावर तेथे जरा चाप बसू लागला आहे. कुलगुरू सामान्य भारतीयांना आनंद होईल अशा काही गोष्टी करत आहेत. त्यातील एक म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज अध्यासन केंद्र चालू झाले आहे. त्या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वक्ते म्हणून तेथे गेले होते. एक सुंदर कार्यक्रम झाला. मी आनंदी झालो.
मी आनंदी का? छत्रपति शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे चिंतन करत होते न की फक्त महाराष्ट्राचे हे नीट अधोरेखित झाले. शिवाजी महाराज हे दूरदृष्टीने राष्ट्र उभारणी करत होते हे अधोरेखित झाले. अत्यंत कूपमंडूप वृत्तीच्या आधुनिक महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक नेतृत्वामुळे वैश्विक नेतृत्व प्रशिक्षणासाठी ज्या छत्रपति शिवाजी महाराज यांचा विचार व्हावयास पाहिजे होता त्यांना महाराष्ट्राचे राजे बनवले होते, त्या जोखडातून महाराज बाहेर पडले आहेत. शिवाजी महाराज हे फक्त घोषणेसाठी नाही तर अभ्यासासाठी आहेत हे अधोरेखित झाले. एवढ सगळ आंनदी होण्यासाठी खूप आहे. पण आम्हाला विजयाने आंनदी होता आले पाहिजे.
कुणी तरी चार दोन टाळक्यांनी काही तरी गोंधळ केला म्हणून आम्ही दु:खी . संतप्त. आमचे उद्दिष्ट प्राप्त झाले याचा आनंद करायचा, अभिमान बाळगायचा की खोट शोधून दु:खी व्हायच. निर्मिक व्हायचं असेल तर निर्माणाचा आनंद घेता आला पाहिजे. मी तो घेत आहे. गंगा स्नान करायच आहे तर मला गटारीवर रागवून गंगास्नानाचा आनंद गमावता येणार नाही.
पण तरीही या उत्तम निर्मितीत मला एक सूचना करायची आहे. Popular leader बोलवाच. त्याचे उत्तम भाषण हवेच कारण तो जनतेचा प्रतिनिधी आहे. पण आज एक Academic discourse हवा होतो. कोणीतरी गजाभाऊ मेहेंदळे यांनी इतिहासातील सत्यासत्यता मांडायला हवी होती कारण हे अध्यासन स्थापन होत आहे. पण हरकत नाही. विजय हा विजयच असतो व JNU मध्ये शिवाजी महाराज अध्यासन म्हणजे राष्ट्र, राष्ट्रीयत्व याचे धगधगते अग्निकुंड च पेटले आहे.
यातून राष्ट्रप्रेमाची स्फुलिंग उडतील तो माझा आनंद आहे.
सुनील देशपांडे
9420495132
Comments
Post a Comment