लटकणारे चेहरे

लटकणारे चेहरे 

सिएनआर राव यांना रसायन शास्त्र योगदानासाठी भारत रत्न मिळाले आहे. पण त्यांच्या विषयातील योगदाना व्यतिरिक्त ते अन्य गोष्टींसाठी माहिती नाहीत. असेच बरेच जण असतात.
पण एका क्षेत्रातील तज्ञता प्राप्त माणूस अचानक सर्व क्षेत्रीय विद्वान जाहीर झाला की भिती वाटू लागते. 
मग लक्षातही येते की अरेच्या एखाद्या विषयातील तज्ञतेने हा माणूस सध्याच्या प्रसिध्दी युगात, जमिनी पाया सोडून वहावत जात आहे. सरकार विरोधातील आशादायी चेहरा म्हणून स्वतःचा चेहरा वापरु द्यायला तयार होतो. आपला विषय, आपले कार्य सोडून सर्व निसरड्या विषयांवर भाष्य वा कृति करु लागतो. कठपुतली खेळवणा-याला गोंडस बाहुली मिळते. तो वापरतो. व एके दिवशी त्याची गरज संपल्यावर टाकून देतो.
नाम महात्म्य संपल्यावर त्या एकाकी जिवाला एकाकीपणाची कारणमिमांसा ही झेपत नाही. मी असा Large than life कसा झालो हे कळत नाही व एकटा का पडतो हे समजत नाही.
एकीकडे स्वत: च्या विषयाला वाहिलेल्या व्यक्ती स्मरणात रहातात. कधी भैरप्पा, कधी गजाभाऊ मेहेंदळे. कारण ते स्वस्त बनत नाहीत. जगत असताना किंवा मरताना. नाही तर सोनम वांचुकांची काही कमी नाही.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन