हिंदू वैश्विक चिंतनाची जागतिक गरज
हिंदू वैश्विक चिंतनाची जागतिक गरज
हिंदू वैश्विक चिंतनाची जागतिक गरज लक्षात येण्यासाठी स्मित माझारची कथा खूप महत्त्वाची आहे. त्याची म्हणजे स्मितची, , समयसूचकता सहनशीलता, पराक्रम, कर्तव्य बुध्दी हे सर्व महत्त्वाचे आहेच. पण हे गुण अनेक व्यक्तिंमध्ये सापडतील व त्याचा सन्मान केलाच पाहिजे. पण हिंदू चिंतनाची जागतिक गरज कशी जाणवते ते येथे जाणून घेऊ या.
युएईचे flydubai कंपनीचे विमान मुख्य वैमानिक स्मित माछार चालवत होता. विमान दुबईहून तेल आव्हिव्ह, इस्त्रायलला चालले होते. त्यामुळे स्वाभाविक इस्त्रायली प्रवासी अधिक होते. या विमानाचा सह वैमानिक, ज्याचे नाव उशिरा जाहीर झाले, हमाम अल हमामी हा ओमानी, येथे पंथ दिलाच पाहिजे, इस्लामी पंथ अनुयायी होता. वर आपण स्मितचा धर्म सांगितलेला नाही.
या दु:खद घातपात प्रसंगात तेथे घडलेला प्रत्यक्ष प्रसंग अता पाहू यात. नमाजी हमाम हा अल्लाची, म्हणजे कोणताही देव असे नाही, प्रार्थना करण्यासाठी सिट सोडून गेला. देवाची प्रार्थना करत आहे म्हटल्यावर स्मितने त्याच्या वैयक्तिक प्रार्थनेचा सन्मान करण्यासाठी मागे पहात न बसता समोर पहात होता. त्यावेळी या नमाजीने अल्लाह या स्वतः च्या देवाची, तेहतीस कोटी देवांपैकी एक नाही, प्रार्थना केली व स्मितवर मागून हल्ला केला. पुढील प्रसंग काय घडला ते येथे महत्वाचे नाही म्हणून थांबतो व आपल्या मुळ विषयाकडे येतो.
स्मितच्या विचारधारेत देवाची प्रार्थना कोणाच्या तरी द्वेषासाठी, नाशासाठी, विकृतीसाठी करता येऊ शकते हे बसतच नाही. देव कुणा मर्यादित लोकसंख्यासाठी असतो हे त्या विचारधारेला माहिती नाही. देव सर्वांसाठी समान, भक्तिचा सन्मान करणारा, फक्त कल्याणाचा आशिर्वाद देणारा असतो अशा विचारधारेत स्मित वाढलेला आहे . ज्या विचार विश्वाला हिंदू वैश्विक चिंतन म्हणतात. येथे सर्वांप्रति परमेश्वर पाहिला जातो. येथे संपूर्ण चराचर सृष्टीविषयी एकात्म भाव शिकवला जातो. व हे तत्वज्ञान काल परवाचे नाही तर हजारो वर्षांपासून सिद्ध आहे. वेद, उपनिषदे, गीता, ज्ञानेश्वरी, ११ सप्टेंबरचे जागतिक धर्म परिषदेतील स्वामी विवेकानंद यांनी मांडलेला विचार असा सातत्यपूर्ण प्रवास करत हे विचार विश्व जगाला मार्गदर्शन करत आले आहे. हे सर्व म्हणजे स्मितचे वैचारिक भरण पोषण आहे. अता तेथेच हमाम अल हमामी पण होता. तो अब्राहामिक विचार विश्वाचे प्रतिनिधित्व करतो. येथे मूर्तिपूजक हराम मानले जातात. पण एवढ्याने द्वैताचा द्वेष संपत नाही तर त्याच अब्राहामिक विचार विश्वातील ज्यू विषयीपण तेवढाच विखार? एकदा द्वैत स्विकारले की कशातही वेगळेपण सापडते व ह्याच विचारात विकृतीचा सहज प्रवेश होतो. तेथे हिंदू वैश्विक चिंतन कृतितून सांगणा-या स्मितने रक्त सांडले व द्वेषाने आंधळा झालेल्या हमाम अल हमामीने व ज्यूंनी सुध्दा.
पण समर्पणाचा लाल रंग व द्वेषाला लाल रंग यातील फरक जगाने पाहिला आहे. द्वेषाच्या लाल रंगाचा न्याय करावाच लागणार आहे पण समर्पणाच्या लाल रंगाचा अर्थ जगाला समजून घ्यायचा आहे. म्हणजे हिंदू वैश्विक चिंतन, त्याची समग्रता, न्याय निष्ठूर तत्वनिष्ठा हे जगाला समजून घ्यायचे आहे. व ते कसे शक्य आहे? हे जगाला हिंदू धर्म, हिंदू तत्त्वज्ञान, हिंदू संस्कृती, हिंदू संस्कार, हिंदू नर नारी व भारत देश यांनी समजावुन द्यायचे आहे.
स्मितच्या त्यागाने दोन कृतितून दोन संस्कृती स्पष्ट होतात.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment