श्री गणेशा करूया.
हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. पण आता ब्लॉग रायटिंगच्या प्रांतातही मुशाफिरी करून पाहणार आहे. पूर्वी मेन स्ट्रीम व प्रिंट मिडिया मध्ये मला व्यक्त व्हायला संधीच नव्हती. पण सोशल मीडिया आला व मला व्यक्त होण्याची संधी उपलब्ध झाली. नव्हे तर व्यक्त होण्यासाठी फार मोठे दालनच उपलब्ध झाले.
मला माझ्या सामाजिक जीवनात जाणवणारी वस्तुस्थिती व वर्तमान पत्र दाखवत असणारी दुनिया यांच्यातील विसंगती आत्यंतिक त्रास देत असे. व हाच आक्रोश सर्वसामान्य लोकांचाही आहे हेही मला जाणवत होते.
अयोध्या आंदोलनाने या सर्वांवर कळसच केला. जनक्षोभ कुठे व या वर्तमानपत्रांच्या स्वतःच्या भूमिका कुठे? याचा काही ताळमेळच बसत नव्हता. त्या वेळी तीव्रतेने वाटले की लोकां पर्यंत मला पोहोचता आले पाहिजे.
सोशल मीडिया आला व हे स्वप्न साकार झाले. व्हॉट्स अप फेसबूक ट्विटर आता ब्लॉग.
धन्यवाद सोशल मीडिया. पहिला ब्लॉग तुझ्या आभाराचा व धन्यवादाचा.

सुरुवात खूपच छान झाली आहे. तुझ्या मुशाफिरीला शुभेच्छा.
ReplyDelete👏👏👍
ReplyDelete