श्रमसाफल्य

बाप म्हणून मी खूपच आनंदात आहे. कारण माझा मुलगा ऋषी आज माझ्यासाठी हिरो बनला आहे. तसं तर ऋषी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यश मिळवत असतो, बक्षीस मिळवत असतो, परंतु आज त्यानी जे काही केलं त्यामुळे मला यशापेक्षाही त्याच्यातील गुणाचं अधिक कौतुक वाटलं.
 व्हिजेटिआय मुंबई यांनी  भरवलेल्या व्हॉलीबॉलच्या मॅचेस मध्ये पुण्याच्या सीओईपी च्या वतीने ऋषीने दिवसभरामध्ये 5 मॅचेस खेळून यश संपादन केले.
मला कौतुक करायचं आहे ते आज दिवसभर त्या सगळ्या संघाने केलेल्या कष्टाचं. तरुण मुलांना कष्ट करायला नको आहेत फक्त सोशल मीडिया व ई विश्वातच गुंतून राहिला आवड त. असं म्हणणाऱ्या सर्वांना तरुण मुलांना खरं  काय आवडतं याचं उत्तर मिळालं आहे.
व्हॉलीबॉल सारख्या मैदानी खेळांमध्ये आज दिवसभरामध्ये 5 मॅचेस म्हणजे किमान पंधरा सेट्स या मुलांना खेळावे लागले. आव्हान स्वीकारणे म्हणजेच तर तारुण्य. आज या मुलांनी सिद्ध करून दिले की आम्ही खरे मर्द तरुण आहोत.
मला या तारुण्याचं कौतुक करायचं आहे. नाहीतर एका शेंडाड शिपायाची गोष्ट आपल्याला माहितीच आहे. कसतरी युद्धावर पाठवलं तर मार खाऊन परत आला. काय झालं विचारल्यावर म्हणतो कसा, अहो, एका हातात ढाल आणि एका हातात तलवार आणि दोन्ही पाय त्या घोड्याचा रिकिबीत मी लढणार कसा?  पळणार कसा?
पण आज या सीओईपीच्या विद्यार्थ्यांनी कमाल केली. सकाळी रेल्वेने मुंबईला व दिवसभर 5 मॅचेस खेळून शारीरिक सामर्थ्याची एका अर्थाने एक अग्निदिव्य परीक्षाच दिली.
जिंकण्याचं कौतुक असतं ते येथे पण आहेच. पण खेळात हार-जीत ही होतच असते. आज या ठिकाणी गुणांचं मूल्यवर्धन झालेले दिसले. त्या गुणवत्तेचं कौतुक, त्या श्रमाच कौतुक व त्या श्रमातला एक वाटेकरी माझा मुलगा ऋषी,म्हणून मला त्याचं विशेष कौतुक.
अभिनंदन ऋषि व त्याच्या मित्रांचे.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन