प्रश्न विचारू या

फादर दिब्रिटो यांना प्रश्न पडला आहे की गाय महत्त्वाची की माणूस? अशी एक मोठीच प्रश्नांची मालिका तयार करूया. अखिया वरचा प्रश्नच परत विचारूयात की गाय महत्त्वाची का क्रूर तरस? कायदा कोणीच हातात घेऊ नये परंतु आतापर्यंतचा इतिहास पाहता गोहत्या ही अतिशय क्रूर म्हणूनच इतिहासामध्ये पाहिली गेली आहे. व हिंदू समाजाचा अपमान हाच त्याचा बहुतेक वेळा हेतू राहिलेला आहे.
आता फादर दिब्रिटो यांना प्रश्न विचारू. आठवण करून  काही प्रश्न आपण विचारुयात.
बलात्कारित नन महत्त्वाची की बलात्कार करणारा फादर? अद्यापही फादर दिब्रिटो यांनी फादर विरुद्ध उघड भूमिका घेतलेली वाचनात आलेली नाही.पदोपदी तुकाराम महाराजांचे स्मरण करणाऱ्या फादर दिब्रिटो यांनी या फादरला नाठाळाचे माथी हाणू काठी असा शब्दप्रयोग केलेला वाचनात आलेला नाही. चर्चच्या मखमली जाजमा खाली जणूकाही सगळं आलबेल आहे अशा स्वरूपात अन्य धर्मांच्या बारीक-सारीक गोष्टी मध्ये कावळ्याच्या चोची मारण्याचे उद्योग करणाऱ्या फादर दिब्रिटो यांनी कृपया या बलात्कारी फादर या विषयीची आपली भूमिका स्पष्ट करावी.
फाशी झालेला अतिरेकी महत्त्वाचा की नसिरुद्दीन शहा चे अभिव्यक्तिस्वातंत्र्य? एखादा माणूस मारला गेल्यानंतर जर आपल्याला असुरक्षित वाटत असेल तर शेकडो हजारो बॉम्बस्फोटांमध्ये चे लाखो निरपराध लोक मारले गेले त्यावेळी आपल्याला असुरक्षित का वाटले नाही? हा प्रश्न विचारणे चूक होईल का?की हे बॉम्बस्फोट करणारे अतिरेकी आपल्या विरोधात नाहीत याची पहिल्यापासूनच आपल्याला खात्री होती?
प्रश्नांची मालिका थोडी अशीच पुढे घेऊन जाऊयात. अमेरिकेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील फादर्स ना वाचवण्यासाठी ची प्रचंड रक्कम व्हॅटिकनला खर्च करावी लागते ती कोठून येते? सामान्य ख्रिस्ती माणूस सद्भावनेने जी रक्कम देतो तीच तर या कामासाठी वापरली जात नाही ना? हा प्रश्न मला पडतो आहे. पांढरा डगला काढून संविधान, स्त्री अत्याचार, चर्चमधले प्रश्न, लैंगिक अत्याचाराची प्रकरणे मिटवण्यासाठी द्यावे लागणारे पैसे या विरोधात  फादर दिब्रिटो कधीं रस्त्यावर येतील? मला त्यांना साथ देण्याची इच्छा आहे. प्रश्न खुप आहेत परंतु दांभिकता. करण्यासाठी एवढे प्रश्न पुरेसे आहेत

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन