तीन तलाकच्या निमित्याने

तीन तलाक च्या विरुद्ध लोकसभेमध्ये कायदा पास झाला.नागरी मुल्यांचे समर्थन करणाऱ्या सर्व भारतीयांना मनापासून आनंद झाला. मुस्लिम स्त्रियांची एका अमानुष प्रथेपासून सुटका झाली. मुस्लिम स्त्रीच्या संसारावरील टांगती तलवार दूर झाली. निदान अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा मार्ग तरी खुला झाला.
परंतु यानिमित्ताने एक वेगळीच महत्त्वाची गोष्ट घडली आहे. व्यक्तिगत कायदा नावाच्या तुरुंगामध्ये डांबून ठेवलेल्या मुस्लिम समाजाला मुक्तीचा एक मार्ग सापडला आहे.
शरीया सर्वश्रेष्ठ, कुराण ईश्वरीय व म्हणून अपौरुषेय याविरुद्ध पहिले पाऊल पडले आहे. मुस्लिम वैयक्तिक कायद्याचा अर्थ काय हे भारत सरकार, भारतीय न्यायालय ठरवू शकणार नाहीत. तर फक्त मुल्ला मौलवी आणि वेगवेगळे धर्म दलाल ठरवतील या मुद्याला मूठमाती मिळाली आहे. मला हा मुद्दा अधिक महत्त्वाचा वाटतो. भारतीय मुल्ये व भारत देश याविषयी अप्रीती निर्माण करण्यात कुराण व शरीया यांची फार मोठी भूमिका आहे. 
त्यामुळे पुढील काळात मूर्तिभंजन, देशाला माता न मानणे अशा प्रकारच्या अज्ञांनासुद्धा चाप लावला गेला पाहिजे.
ज्यावेळी अशाप्रकारे बहुसंख्यांक समाजाच्या भावना दुखावणारी व त्याचा द्वेष करणारी कलमे ज्यावेळी कुराणामधील दूर होतील त्याच वेळी भारतामध्ये शांततामय सहजीवन निर्माण होऊ शकेल.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन