सेवेचा सन्मान डॉक्टर अशोक कुकडे
डॉक्टर अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याचे आजच समजले. आणि एक सकारात्मक उर्जा संपूर्ण शरीरातून चमकून गेली. अशी सकारात्मक ऊर्जा आपल्या अस्तित्वाने परिसरात निर्माण करणे हीच या माणसाची महानता आहे.
थोडासा अशोकरावांचा परिचय. पुण्यामधून एम एस पूर्ण केल्यानंतर ज्या ठिकाणी वैद्यकीय सेवा नाही अशा ठिकाणी जाऊन वैद्यकीय सेवा सुरू करण्यासाठी लातूर हे कर्मस्थळ स्वीकारले. ही काकांची संघस्थानावर घेतलेल्या संस्काराची पहिली सामाजिक परतफेड होती. मारण्यासाठी फक्त शस्त्र उगारतात असे माहिती असलेल्या गावांमध्ये वाचवण्यासाठीसुद्धा शस्त्र उचलले जाते हे काकांनी पहिल्यांदी समजावून सांगितले.
वैद्यकीय सेवा संघ कार्य हे दोन्हीही काकांनी सर्वप्रथम लातूरमध्ये प्रतिष्ठित केले.
सर्वे शाम अविरोध ठेवून या संघ संस्काराच्या मार्गाने काकांनी सर्व लातूरकरांना नव्हे पूर्ण मराठवाड्याला आपलं केल. अनेकांना संघ समजला तो या विवेकानंद रुग्णालयाच्या माध्यमातूनच.
आणीबाणीच्या दोन वर्षाच्या काळ्या कालखंडांमध्ये हे हॉस्पिटल ताठ उभे राहू शकले याचे कारण डॉक्टर काकांनी सर्वेषां अविरोधेन या भूमिकेतून जोडलेल्या माणसांमुळेच.
मनातल्या मनात एकेका ऑपरेशनची कल्पना करून मी दोन वर्षे काढली. असे वर्णन त्यांनी स्वतःच्या मिसाबंदीच्या काळातील दोन वर्षाचा तुरुंगवासाचे वर्णन त्यांनी केले होते.
लातूर मधील कोणतीही समाजोपयोगी काम हे डॉक्टर काकांच्या नेतृत्वाखालीच होणार असा नियमच झाला आहे.
किल्लारीचा भूकंप किंवा परवा जलसंधारणाचं दुष्काळात झालेले भारतातलं सर्वात मोठं काम, किंवा एखादी शिक्षण संस्था किंवा संवेदना केंद्र सारखे अपंग मुलांचे विकसन केंद्र. काका मस्ट.
लिहायला खूप आहे पण काकांची भेट हेच खरे शिक्षण आहे.
त्यांना मिळालेले पुरस्कार सांगून मी काकांना लहान करू शकणार नाही. काका सेवा करत चालली आहेत व पुरस्कार त्यांच्या मागून मागून धावत येतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कार्यकर्त्यांच्या वर्तनातून समजतो हे वाक्य 100% सिद्ध करणारे स्वयंसेवक म्हणजे डॉक्टर अशोकराव कुकडे व त्यामुळे आज ते सन्मानित होताना असंख्य स्वयंसेवकांना स्वयंसन्मानित झाल्याचा आनंद होत आहे.
म्हणून हा सेवेच्या सन्मान आहे.

Comments
Post a Comment