चला प्रबोधन करूया.

चला मतदान करू या. तरुणांनो मतदान करा,  प्रौढांनो मतदान करा, महिलांनी मतदान करा, प्रत्येक भारतीयांनी मतदान करा. 2019 च्या निवडणुकीत फक्त एवढेच प्रबोधन करावे लागणार आहे. कारण आहे या देशातील सर्वात जुना राष्ट्रीय पक्ष.
पूर्वी मतदानाला जाताना सक्षम चेहरे समोर दिसत असत, पण यावेळी त्या पक्षाने असा चेहरा समोर ठेवला आहे की सामान्य जनतेला मत देण्यापूर्वी विचार करण्याची गरजच शिल्लक नाही. यात आनंद नाही पण एखाद्या राष्ट्रीय पक्ष्याची अगतिकता पाहताना भारतीय लोकशाहीला लाज वाटत असेल.
त्यामुळे यावेळी प्रबोधनासाठी काही मुद्दे शिल्लकच नाहीत हे सहजपणे जाणवते.त्या सर्वात जुन्या राजकीय पक्षानी जो चेहरा देश चालवण्यासाठी पुढे आणला आहे, याच्या मध्ये भारतीय मतदारांच्या प्रगल्भतेचा भीषण अपमान आहे. व हा अपमान प्रतिशोध घेण्यासाठी पुरेसा आहे, असे वाटते.
त्यामुळे सकारात्मक मतदान करा व आपल्या प्रगल्भतेचा अपमान करणाऱ्या पक्षाला कायमचा धडा शिकवा अशी विनंती करणे एवढेच हातात शिल्लक आहे. सकारात्मक अशासाठी की नोटा हे मतदान नाही. नोटा हे व्यवस्था नाकारून अराजकता निर्माण करण्याचे कटकारस्थान आहे असेच पाहिले पाहिजे. नोटा फक्त नाकारतो, कुठलीही पर्यायी व्यवस्था निर्माण करत नाही. लोकशाहीचा उत्सव हा सकारात्मकच असला पाहिजे.
म्हणून मतदान करा, सकारात्मक करा, व कुणाला करा हे सांगण्याचा पर्यायच नसल्यामुळे एकाच एकाला करा.
ही माझी वैयक्तिक अभिव्यक्ती आहे.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन