अयोध्या स्मरण


जन्मस्थळावर मंदीर हा निर्णय आला आहे. हा संपूर्ण देशाचा विजय आहे. पण विजय म्हटला कि त्यातील प्रसंग व सेनानी यांचे स्मरण अत्यावश्यक असते.
 
काही व्यक्तिस्मरणे आवश्यक आहेत. जसे
बाळासाहेब देवरस, मोरोपंत पिंगळे, अशोकजी सिंघल, लालकृष्ण अडवाणी. 

संघर्ष व समन्वय दोनही गोष्टी एकाच वेळी करणार नेतृत्व हे या नेतृत्वाच सर्वात महानपण होत. ढाचा पडल्यानंतर कारसेवकांच्या राम खिचडी कार्यक्रमास बाळासाहेब देवरस वृध्द व आजारी असतानाही उपस्थित राहीले व संघर्षशील कार्यकरत्यांचे मनोबल वाढविले. पेट्रोलची भिती घातल्यावर मोरोपंत पिंगळे म्हटले कि म्हसोबाला नाही बायको व सटवाईला नाही नवरा अशी अवस्था असते. ते पेट्रोल विकण्यासाठी शेखसुध्दा रामनाम घेतील. अशी विजुगिशी वृत्ती नेतृत्व करत होते.

प्रासंगिक म्हणाल तर पूर्ण देशाने, जातपात विरघळलेली पाहिली, भाषा, प्रांत, विरलेले पाहिले,  संपूर्ण देशाने एकत्र केलेली कृती पाहिली व हे राष्ट्र हे सांस्कृतिक दृष्ट्या
 एकसंघ आहे याची अनुभूती घेतली.
आज विनम्रपणे विजय स्विकारताना वरील गोष्टींचे स्मरण आवश्यक आहे.
कारण यशाची कारणमिमांसा पुढील वाटचालीसाठी आवश्यक असते.
रामजन्मभूमी निर्णय आज आला पण हजार वर्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे ते फलित आहे ह्याचे स्मरण आज आवश्यक आहे.

जय श्रीराम.🙏

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन