नियतीशी करार

आज १५ ऑगस्ट रात्री १२ वाजता आम्ही इंग्रजांच्या दास्यातून मुक्त झालो. देश आनंदून गेला. अथक परीश्रमाला, त्यागाला यश आले व गुलामी संपली. आनंदी व्हाव, चित्तवृत्ती प्रफुल्लित व्हावी असा प्रसंग. पण भारत स्वतंत्र झाला या सुवर्ण क्षणांना कुठेतरी काळी किनार होती. आम्ही रात्री १२ वाजता 'नियतीशी करार ' करत होतो, त्यावेळी काही कोटी देशबांधव भकासपणे फक्त जिवंत रहाण्यासाठी जीव मुठीत धरून पळत होते. सिंधू तीर सोडत होते.

 

भारताची फाळणी या हृदयद्रावक विषयावर लिहायची इच्छा झाली तर लेखणी गोठून जाते. पण या ७५ वर्षांचा विचार म्हणजे या रक्तबंबाळ अगतिकततेचा विचार, कारणमिमांसा, उत्तर याचा विचार क्रमप्राप्तच आहे.


पण आधी जरा दिल्लीत जाऊ. नियतीशी करार सुरू झाला. पण भविष्यात भारताला व भारतवासीयांना कोणत्या दिव्यातून जायचे आहे हे सांगणाराच तो करार होता.


या पवित्र देशात पहाट पवित्र मानली जाते, दिवस सुर्योदय ते सर्योदय असा असतो, त्या देशाच्या जनसामान्यांना ही गोष्ट वज्रलेपात सांगितली गेली कि हे फक्त राजकीय सत्तांतर आहे. तुमचे राज्यकर्ते इंग्रज यांचा दिवस रात्री १२ ला सुरू होतो. व तुमचाही.

पण याहूनही गंभीर गोष्ट म्हणजे आमच्या काळजाचा तुकडा, महर्षि पाणिनी यांचे जन्मस्थान, याची फाळणी होऊन तो मुस्लिम बहुल प्रदेश आमच्या खंडीत स्वातंत्र्याआधी स्वतंत्र झाला.

अगतिक, लाचार व स्वत्वहीन नेतृत्वा बरोबर चंडप्रतापी, स्वत्वाची नीट ओळख असलेल्या, जबाबदार हिंदू समाजाचा विचित्र नियतीचा करार झाला होता.


यामुळे काय घडले? हे पुढील काही लेखांत पाहू या. स्वातंत्र्योत्तर भारताचा हा कालखंड खूपच महत्वाचा आहे.

सुनील देशपांडे.

[Article 2/n]

To read articles together follow my blog manusnavachekam.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन