राष्ट्र संक्लपना व इस्लाम एक दुविधा.

लेखांक ४

फाळणीची मानसिकता कशी होती हे समजण्यासाठी काश्मीर समस्या हे सर्वात महत्वाचे साधन आहे.

राष्ट्र या सांस्कृतिक संक्लपनेचा आव्हेर झाल्यामुळे सांस्कृतिक राष्ट्रवादा ऐवजी मुस्लिम अनुनय ही स्वातंत्र्याची पूर्व अट ठरली.

हैद्राबाद, गोवा याहूनही काश्मीर वेगळे आहे. नेतृत्व समज यातही फरक पडला. हैद्राबाद कृती झाली कारण सरदार पटेल हे प्रमुख होते. हैद्राबाद मुक्ती आंदोलन सरदार पटेल यांनी संवेदनशीलपणे हाताळले व निजाम शरण आला. मुस्लिम अनुनय टाळला गेला.

पण हे भाग्य काश्मीरच्या नशिबी नव्हते. पंडीत नेहरू यांच्या पराकोटीच्या मुस्लिम अनुनय भूमिकेमुळे काश्मीर आले पण ३७० कलमाचे लोढणे घेऊन.


एकाच देशात दोन प्रधान, दोन निशाण, दोन विधान अस्तित्वात आले. प्रताडित हिंदुंना काल पर्यंत नागरीकत्वही मिळू शकले नाही. यासाठी फाळणीचे स्मरण अत्यावश्यक आहे. कारण आजही CAA  ला विरोध या फाळणीच्या मानसिकतेमधून होत आहे.

देशाच्या सार्वभौमत्वाला आच आली तरी चालेल पण मुस्लिम अनुनय सोडणार नाही हा फाळणी भाव आज ही शिल्लक आहे.

म्हणून काश्मीर प्रश्न अजून एका लेखात समजून घेऊ या.

सुनील देशपांडे.

Article (4/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन