राष्ट्रीय ओळख विसरलो

लेखांक ८*

स्वातंत्र्य आंदोलनाचे प्रेरणास्रोत वंदे मातरम् हे गीत होते. भारत माता की जय हीच घोषणा होती. इंग्रज घालवा ही उर्मि होती व या विषयी नेतृत्वापासून समाजापर्यंत कुणाच्याही मनात संशय नव्हता. 

ही आमची जमीन आहे या बद्दल संशय नव्हता. ह्या भारतभूमी बाहेर श्रद्धास्थाने नव्हती व आम्ही विजयी वीर आहोत हा विश्वास होता. इंग्रजांनी भारत मराठ्यांकडून म्हणजे हिंदूंकडून जिंकला हा इतिहास देशाला माहिती होता.

तो पर्यंत या राष्ट्रीय चळवळीला विकृत पराभूत मानसिकतेने ग्रासलं नव्हतं. पण धूर्त इंग्रजांच्या  राष्ट्र व राष्ट्रीय समाज ह्या संकल्पना प्रश्नांकित करण्याच्या खेळीला यश येऊ लागले.

आर्य गुणवाचक शब्द वंशवाचक बनला, मग एतद्देशीय हिंदू हे पण उपरेच हा भाव जागवला गेला. आत्मश्लाघेने समाज लज्जित बनेल हा प्रयत्न झाला. व 
१९०६ सालची फाळणी मोडून काढणारा समाज, १९४७ पर्यंत स्वत्वहीन व पराभूत समाज बनला. हिंदू भाव नष्ट केल्यावर या समाजाची ओळखच काय राहीली? 
लखनौ करार, खिलापतीचे लोढणे घेऊन विजयासाठी नाही तर फक्त सत्तांतरासाठी हा विश्वगुरू हिंदू समाज लाचारीचा कटोरा घेऊन उभा राहिला.


व जे मिळेल ते मोडके तोडके स्वातंत्र्य स्विकारले.

ह्या कारणाने झाली राष्ट्रीय चळवळीची अगतिक स्थिती.

पण या काळात काही सुप्त प्रवाह कार्यान्वित होते म्हणून या ७५ वर्षात काही दैदिप्यमान इतिहास घडला. त्याचा मागोवा घेऊ या.

सुनील देशपांडे.

Article (9/n).

Photo courtesy Google

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन