सावरकर चिंतनाचा प्रभाव
लेखांक १२*
स्वामी विवेकानंद यांचे शिकागो भाषण हे भारताच्या वैश्विक मार्गदर्शन करण्याच्या क्षमतेचे फक्त बीज भाषण होते पण ते स्वातंत्र्य लढ्याची उर्मी ठरली तसेच स्वातंत्र्योत्तर भारताचे ध्येय ठरले. म्हणून प्रत्येक भारतीयांसाठी ते भाषण हे अर्वाचीन काळातील गीता बनली आहे.
पण तसेच स्मरण स्वातंत्र्य वीर सावरकर यांचेही केले पाहिजे. आजच्या भारतीय गौरवात ज्या दोन प्रमुख गोष्टींचा समावेश आहे त्याची पार्श्वभूमी सावरकर चिंतनात आहे.
प्रथमतः आमची विदेशनिती ही अव्यवहारीक ध्येयवादावर नव्हे तर निखळ राष्ट्रीय स्वार्थावर अधिष्ठित पाहिजे हे त्यांनी सांगितले व आपण अनुभवत आहोत कि स्वप्नाळू भाबडेपणाने आपण काय गमावले होते व इस्राएल मैत्री व सर्वच राष्ट्र प्रथम निर्णय यांने कसे आंतरराष्ट्रीय स्थान मिळवत आहोत. श्रेय द्यावे कि नाही हे आमच्या मनाच्या मोठेपणा किंवा कद्रू पणाकडे आहे पण इतिहास साक्षी आहे कि आजचे आंतरराष्ट्रीय स्थान हे त्या द्रष्ट्याच्या महान चिंतनातून प्रकटलेले आहे.
तसेच सुरक्षित सीमा व लष्करी सामर्थ्य हेच जगाला समजते हे त्यांनी जगातील समस्त देशांचा अभ्यास करून मांडलं व त्याचा तिरस्कार करून ६२ चा अपमान स्विकारला तर हा सावरकरी सिध्दांत स्विकारून Surgical strike व चीनशी दोन हात केले. आज चीन पासून रक्षण करणारा तारणहार देश म्हणून चिनी समुद्रातील देश भारताकडे पहात आहेत तर अमेरिका व रशिया हे बलाढ्य देश ही चीनच्या धोक्याविरोधात भारताच्या भूमिकेचा सन्मान करीत आहेत.
इंग्रजांच्या दास्यातून मुक्तता ही फक्त सनदशीर कायदेभंगानेच झाली, अशी जरी आमची धारणा करून दिली असली तरी नौदलाचे अथवा नाविकांचे बंड, याची पण एक भूमिका होती हे सत्य कायमच नाकारले गेले. पण म्हणून स्वातंत्र्य लढ्यातील शस्त्राचे महत्व नाकारले जाणार नाही. व स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेले लेखणी मोडा शस्त्र उचला हा संदेश शिरोधार्य मानून लष्करात सामील झालेले देशभक्त तरूण हे ही महत्वाचे होते. बंदुकीच्या नळीची दिशा बदलू पण आधी हाती बंदूक तर घेऊ, हाच तो सावरकरी संदेश व भारताला भविष्यासाठी दिशादर्शन होते.
हा आहे सावरकरांचा या ७५ वर्षातील भारत प्रभावावरील ठसा.
अशाच एका स्व्यातंत्र्यासाठी असूसलेल्या पण वेगळाच मार्ग निवडलेल्या अवलिया व्यक्ति व कार्याचा विस्तृत परीचय पुढील अनेक लेखांमधून करून घेऊ यात.
सुनील देशपांडे.
Article (13/n)
Photo courtesy of Google.
Comments
Post a Comment