संपूर्ण शतकावर प्रभाव.

लेखांक १३*

स्वातंत्र्य प्राप्तीसाठी कराव्या लागणाऱ्या खडतर प्रयत्नांसाठी मी सिध्द झालो आहे व त्यासाठी मी विवाह बंधनात न आडकण्याचा निर्णय घेतला आहे. असे आपल्या चुलत्यांना कळवून ती प्रतिज्ञा प्रत्यक्षात आणणार्या महापुरूषाचे नाव
डॉ. केशव बळीराम हेडगेवार.


वरील प्रतिज्ञेचे नायक म्हणून ते या लेखमालेचे महानायक नाहीत. कारण असे जीवन जगलेले अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीर आहेत. परंतू या स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षाच्या काळावर व या पुढील शतकावर सुध्दा त्यांच्या उक्ती व कृतीचा सर्वाधिक प्रभाव राहिला आहे व राहणार आहे. म्हणून या लेखमालेतील सर्वाधिक जागेचे ते मानकरी आहेत.

हेडगेवार यांच्या प्रतिज्ञेचे दोन भाग आहेत. एक विवाह करणार नाही की जो तुलनेने सोपा आहे. पण आयुष्यभर मी स्वातंत्र्यासाठी खडतर मार्गाने प्रवास करणार आहे म्हणून पायात संसाराची बेडी नको हा भाग कर्म कठीण होता.

पण त्याहूनही अवघड म्हणजे ती प्रतिज्ञा तुच्छ वाटावी एवढी अवघड पायवाट त्यांनी स्विकारली, ते जगले, व वैशिष्ट्य म्हणजे ती पाऊलवाट लाखोंना जगायला शिकवली.

त्या  हेडगेवार शिक्षितांनी या ७५ वर्षांवर डॉ हेडगेवार उवाच असे ठसठशीत अक्षरात लिहीले. म्हणून या पुढील लेखांत डॉ हेडगेवार, त्यांचे कार्य, त्यांचा प्रभाव व त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आपण अभ्यासणार आहोत.

सुनील देशपांडे

Article (14/n)

Photo courtesy Google.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन