१९,२०,२१ शतकांमधील आश्चर्य

लेखांक १४*

स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे होत आहेत. हिंदूत्वाचा द्वेष, हिंदुत्वाविषयी अपराधीपण, राष्ट्र संक्लपने विषयी सरकार व म्हणून समाजातील धुसरं धारणा व या सर्वाचा परीणाम म्हणून सहभागाने उन्नती हे तत्व विस्मृतीत गेलेल्या सुरवातीच्या काळापासून ते माझा देश माझी जबाबदारी अशा जबाबदार समाजात परीवर्तित झालेला देश हे कल्याणकारी चित्र जे दिसतं आहे त्याचे निर्माते म्हणजे
 *डॉ केशव बळीराम हेडगेवार.*

सन १८८९ साली जन्म व १९४० साली मृत्यू, असे ऊणेपुरे ५० वर्षाचे आयुष्य लाभलेले डॉ हेडगेवार यांनी विसाव्या व एकविसाव्या शतकावर पूर्ण प्रभाव टाकला. 

राजा शालिवाहन

पाडव्याच्या शुभदिनी जन्म हा जणू नियतीचा संकेतच हिंदू समाजासाठी म्हणजे भारतीय समाजासाठी होता. शककर्ते शालिवाहन यांनी मातीच्या सैनिकांमध्ये प्राण फुंकून युध्द केले व नवीन कालगणनाच सुरू झाली. डॉ हेडगेवार यांनी मृतप्राय हिंदू समाजामध्ये, पराक्रम, स्वयंप्रेरणेचे अमृत सिंचन केले व आज दोन शतके त्यांचे विचार व कृती हे सर्व जगाला मार्गदर्शन तरी करीत आहेत किंवा खुणावत आहेत.

म्हणून समजावून घेऊ डॉ हेडगेवार यांचे जीवन व कार्य.

सुनील देशपांडे.

Article (15/n)

Photo courtesy Google

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन