पारतंत्र्याची कारणमिमांसा व उत्तर. डॉ हेडगेवार

लेखांक १८*

अखेर सर्व परीस्थितीचे आकलन झाल्यावर काय करायचं व का करायचं याचे मंथन सुरू झाले. देश पारतंत्र्यात पडला याचा दोष इतरांच्या माथी मारण्याची चूक न करता, आमचं अपयश आमचा दोष ह्याचा स्वीकार केला.व नंतर हा माझा समाज स्वयंप्रेरणेने, एकसमयावच्छेदे करून, सार्वत्रिक, एकच एक कृती करेल अशी तयारी केली पाहिजे हे डॉ हेडगेवार यांनी समजून घेतले.या समाजाला आत्मश्लाघेच्या दोषाने घेरलेले आहे. त्यामुळे समाजाचा आत्मसन्मान जागा करून दोषमुक्त करण्याची आवश्यकता आहे हे जाणले.

तसेच विजयाकांक्षी होण्यासाठी ध्येयवाद आवश्यक असतो. व हिंदू समाजाला तर आत्मग्लानीचा रोग लागलेला होता. हा रोग येण्याचे मुख्य कारण राष्ट्र या संकल्पनेवर झालेला आघात. राष्ट्र ही संकल्पनाच वादग्रस्त बनल्यामुळे हिंदू समाज हतबुद्ध झाला व स्वातंत्र्याच्या त्याच्या प्रेरणाच नष्ट झाल्या.


त्यामुळे राष्ट्र संक्लपना सुस्पष्ट करणे, या आधारावर हिंदू समाज संघटित करणे, कार्यकर्त्यांची फळी उभी करून स्वयंप्रेरणेने कार्य करण्यास प्रवृत्त करणे, व एकाचवेळी संपूर्ण देश कृती करेल असे ते संघटन असेल, व हे सर्व ज्यातून साध्य होईल अशी कार्यपद्धती ऊभी करणे हे कार्य डॉ हेडगेवार यांनी सुरू केले.

हे कसं केले हे पुढील लेखात पाहू यात.

सुनील देशपांडे.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन