डॉ हेडगेवार स्मरण.
लेखांक १५*
डॉ हेडगेवार जन्मजात देशभक्त होते पण कोणालाही देशभक्त ही पदवी देण्याच्या विरूध्द होते. देशभक्त असणे हा नियम तर देशभक्त नसणे हा अपवाद असतो. अशा धारणेतून त्यांच्या आयुष्यातील सर्व कृती आहेत.
डॉ हेडगेवार बालपणापासून स्वातंत्र्यासाठी कृतीशील होते. शाळेत खाऊचा पुडा फेकून देण्यापासून, इंग्रज अधिकाऱ्यांसमोर संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना वंदे मातरम् म्हणायला लावून, जत्रेत सरकार विरोधात भाषण करून, घरापासून सीताबर्डी किल्ल्यापर्यंत बोगदा खणण्याचा प्रयत्न करून त्यांनी आपला स्वीकृत मार्ग सर्वांना दाखविला व त्याचे परीणामही भोगले.
कलकत्त्यात डाॅक्टरी शिकण्यासाठी गेले पण क्रांतिकारकांच्या अनुशीलन समितीचे सदस्य बनले, उग्र दिसणारे डाॅक्टर स्फोटकही दिसू लागले. मेडीकल बील आंदोलन करून मोडून काढले. गुप्तहेर पकडून त्यालाच खबर्या बनविले व बरोबर डाॅक्टरही झाले.
तिसर्या टप्प्यात जंगल सत्याग्रह केला, तुरुंगात गेले. क्रांतीकारक अनामिकाचे गुप्तपणे अंत्यसंस्कार केले, कट केले, कटाचे साहित्य बेमालूमपणे नष्टही केला.
टिळकांना भेटले, नागपूर काॅंग्रेस अधिवेशनात स्वयंसेवक दलाचे प्रमुख होते, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्हावे ही गळ घालयला पाॅंडेचरीला योगी अरविंदांना भेटायला गेले, संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव काॅंग्रेसने मांडला म्हणून शाखांमधून काॅंग्रेसच्या अभिनंदनाचे ठराव पारीत केले.
स्वातंत्र्यासाठी काहीही व कोणताही मार्ग हे ब्रीद आयुष्यभर ठेवले. त्यात रेषभरही मागे नाहीत सरकले. वर एकेका ओळीत दिलेले काम हे एकेका दीर्घकथेचा विषय होईल इतके वैशिष्ट्यपूर्ण होते.
पण डाॅक्टर हेडगेवार याहूनही दशांगुळे वर होते. ते हेडगेवार माहिती होणे हे फार महत्त्वाचे आहे. कारण या शतकावर प्रभाव पाडणारे डॉ हेडगेवार हे वेगळेच रसायन होते. ते. समजावून घेऊ पुढील लेखात.
सुनील देशपांडे
Comments
Post a Comment