डॉ हेडगेवार यांचे चिंतन

लेखांक १६*

डॉ हेडगेवार हे स्वातंत्र्य सैनिक होते, क्रांतीकारक होते पण थोडे वेगळे होते.
सर्वार्थाने भारतासमोर सामान्य असलेल्या इंग्रजांना भारतात यश कसे मिळाले हा प्रश्न त्यांना सतत पडत राहिला व त्याचे उत्तर व त्यावरील उपाय शोधणं ही निरंतर प्रक्रिया त्यांच्या मनात चालू होती, हे त्यांचं वेगळेपण होते.

 *व्यापार मिषाने आले* असे वर्णन इंग्रजांचे केले जायचे. पण डॉ हेडगेवार ठामपणाने म्हणाले कि नाही ते व्यापाराचे सोंग घेवून आले नव्हते तर खरोखर व्यापारासाठीच आले होते. पण आमचा समाज व देश अशा दुर्रावस्थेत होता कि अनपेक्षितपणे त्यांच्या हाती देशावर राज्य करण्याचे घबाड लागले.

ही भूमिका निश्चित झाली व स्वातंत्र्याच्या प्रयत्नांची त्यांच्यासाठी दिशाच बदलून गेली. रोगाचे निदान झाले व वेगळ्याच शस्त्रक्रियेची गरज जाणवू लागली.

क्रियाशील अस्वस्थतेत चिंतन व त्यातून मार्गाची निश्चिती झाली. लोकमान्य टिळक दैवत होतेच पण अशी दैवते समोर असूनही देव्हारे बनवणं त्यांना शक्य नव्हते. मान्य नव्हते. आशीर्वाद मात्र सर्वांचेच घेणार होते.


चिंतन स्वतःचे, मार्ग स्वतःच ठरविला, प्रवासी पण सुरवातीला एकांडाच होता. पण योग्य चिंतन, मार्गावर विश्वास, व आश्वासक चाल या भांडवलावर पुढील दोन शतकांचा भाष्यकार चालू लागला.

काय विचार केला? काय योजना आखली? कसे क्रियान्वयन केले हे पुढील लेखात पाहू.

सुनील देशपांडे.

Article (17/n)

Photo courtesy Google

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन