पारतंत्र्य का? हेडगेवार चिकित्सा

लेखांक १७*

जगाच्या नकाशावर भारत व इंग्लंड हे कोणी आकार उकाराने पाहिले तर त्याची बोटे आश्चर्याने तोंडात गेल्याशिवाय रहाणार नाहीत. महाकाय भारत व टिचकीभर इंग्लंड. पण या देशाने भारतासारख्या खंडप्राय देशावर १५० वर्षे राज्य केले. मुंगीने हत्तीची शिकार केली. हे कसे घडले.

याचे चिंतन डॉ हेडगेवार यांनी सुरू केले. आमच्या हून शूर होते, आमच्याहून ज्ञानी होते, आमच्याहून समाज ज्ञान म्हणून प्रगल्भ होते? यातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर होकारार्थी येत नव्हते.

तरीही इंग्रज यशस्वी ठरले. कारण देशभक्त शिस्तबध्द समाज, विजीगिषु बेडरवृत्ती, व बरोबर उलट आम्ही. संपूर्ण देश म्हणून विचार नाही, हिंदू म्हणून संपूर्ण समाज एक नाही, व म्हणून भेदभाव, फाटाफुट, आपल काय परक काय यातील फरक कळत नाही, समान मित्र शत्रू भाव नाही.
शिस्त विरूद्ध बेशिस्त १८५७. महान त्याग पण शिस्तीचा अभाव.

त्यावेळी लोकमान्य टिळक म्हटले होते कि सर्व भारतीय एका दिशेला तोंड करून थुंकले तर त्या पुरात इंग्रज वाहून जातील पण दुर्दैवाने आम्ही एका दिशेला तोंड करणार नाही व एकाच वेळी थुंकणारपण नाही. ही होती समाजाची स्थिती. कुंठीत समाज याचे जगातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजेच हिंदू समाज.

सावरकर वर्णन करीत हा हिंदू समाज म्हणजे लाकडी ओंडका आहे. एकीकडून जळाला तरी दुसरीकडे त्याचा काही परीणाम नाही.

स्वामी विवेकानंद म्हणत हा समाज म्हणजे वेड्यांचा बाजार आहे.

अशा पार्श्वभूमीवर डॉ हेडगेवार यांना या हिंदू समाजाला स्वातंत्र्यासाठी उभे करायचे होते. मूळात उपलब्ध मुद्दलातच खोट होती.

अशावेळी या सर्व महापुरूषांची एकच मागणी होती कि देशभक्तीने प्रेरीत तरूण द्या, मी देशाचे चित्र पालटून देतो. पण प्रश्न हाच होता की तरूणात देशभक्ती भरणार कोण? त्यांना एकत्र आणणार कोण?

या सर्व स्वातंत्र्य लढ्यात एक काळा ढग होता कि त्याला सोनेरी किनार होती. या पारतंत्र्याच्या काळात एकही दिवस असा उजाडला नाही कि संपूर्ण देशाने एकावेळी उठाव केला हा तो काळा ढग पण त्याचवेळी एकही दिवस असा उजाडला नाही कि ज्या दिवशी उठाव घडला नाही, ही ती सोनेरी कड.

या पार्श्वभूमीवर डॉ हेडगेवार यांनी सर्व तत्वज्ञान, व प्रमुख म्हणजे कार्यपध्दती उभारली व ते सर्व सुकृत आजही भारतच नव्हे तर जगभरावर गारूड घालत आहे.

ते समजून घेऊ पुढील लेखात.

सुनील देशपांडे.

Article (18/n)

 Photo Courtesy Google.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन