स्वातंत्र्यासाठी कार्यपध्दती रा.स्व. संघ
लेखांक २०*
बालपणापासून देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या डॉ हेडगेवार यांचे विविधांगी चिंतन वयाच्या ३६ व्या वर्षी पुर्णत्वास गेले व या चिंतनाला प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी जी कार्यपद्धती त्यांनी स्वीकारली तिचा जन्म १९२५ विजयादशमीला झाला.
*राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.* हे नामकरण ही नंतर झाले. ही संस्था चालू झाल्यावर अनेक वर्षांनी संस्था बनली. अनेक वैशिष्ट्यांचे पेटंट घेतलेल्या संघाचे हे पहीले वैशिष्ट्य होते कि जन्मापासून ही संस्था सहज स्वाभाविक विकसित झाली. Nothing formal. लहान मूल नाव घेऊन जन्माला येत नाही. तशीच स्वाभाविक प्रक्रिया घडली संघ जन्माची. शाखा नावाने परिचित अशी कार्यपद्धती.
पंधरा वर्षे ही कार्यपद्धती डॉ हेडगेवार यांनी स्वतः च्या हातानी रूजवली व संपूर्ण जग या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपध्दती कडे कौतुकाने, आश्चर्याने, विस्फारीत नजरेने पहात आहे, तर काही जण असूयेनेसुध्दा पहात आहेत.
सामान्य हिंदू स्वयंप्रेरणेने समाजासाठी कार्यप्रवण झाला पाहिजे. हे उद्दिष्ट. जन्माला आली रोजची एक तासाची शाखा. निस्वार्थ बुध्दीने रोज एक तास समाजासाठी काढा.
संपूर्ण देश संघटित करायचा. फक्त नागपूर नाही, म्हणून देशभर संघशाखा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रथम षुरूषी एकवचनी काम हे कळावे म्हणून माझी शाखा मी मैदान साफ करणार, माझा मी खर्च करणार. संकट गावावर आले मी धावून जाणार, विनंतीची वाट नाही पहाणार.
देशभक्ती भाषणाचा नाही , रोजच्या संस्कारांचा विषय आहे. मातृभूमीचे रोज स्मरण. गीत, प्रार्थना भारत माता की जय रोज म्हणणार.
आमचे पुर्वज, पराक्रम यांचा अभिमानही सांगणार व त्यांच्या चुकांची जबाबदारी पण घेणार. संघात सर्व फक्त हिंदू. उच्च नीच नाही. लहान रेघ मोठ्या रेघेने समाप्त करणार.
कळसाध्यायासाठी हिंदू समाज सज्ज केला.
ही कार्यपध्दती ध्येयवाद व म्हणून राष्ट्र उभारणीसाठी कशी यशस्वी ठरली ते पुढील लेखांपासून पाहू.
सुनील देशपांडे.
Article (21/n)
Photo courtesy Google.
Comments
Post a Comment