कार्यपद्धतीचे सुतोवाच
लेखांक १९*
कारणमिमांसा करून झाल्यावर त्यावरील उपाययोजना निश्चित केली व सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सुचलेली उपाय योजना अमलात आणण्यासाठी आवश्यक अशी कार्यपद्धती उभी केली.
सर्व स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणार्या नेतृत्वामध्ये डॉ हेडगेवार यांचे वेगळेपण हे या कार्यपद्धतीमुळे आहे. बाकी सर्वांनी उपाय सुचविले पण डॉ हेडगेवार यांनी त्यासाठी कार्यपद्धती सुचविली व नुसती सुचविली नाही तर प्रत्यक्षात उतरवून दाखविली.
ध्येयवाद, ध्येयवाद व्यवहारात येण्यासाठी कार्यकर्ता व कार्यपद्धती, व ती कार्यपद्धती स्वतः ने व्यवहारात आणणे ह्या सर्व पायय्रा डॉ हेडगेवार यांनी स्वतः अमलात आणून दाखवल्या. व म्हणून डॉ हेडगेवार हे २० व २१ या दोनही शतकांवर मोहर उमटवून उभे आहेत.
हे दगडगोटे व घाणीने भरलेले मैदान स्वतः डॉक्टर हेडगेवार यांनी स्वतः साफ करण्यास सुरुवात केली. हा संस्कार. प्रथम पुरुषी एकवचनी काम करण्याचा. मोहीते वाडा संघस्थान.
प्रथमतः ह्या समाजाला कार्यप्रवण करायचे असेल तर त्याला स्वतः च्या स्वत्वाची जाणीव निर्माण केली पाहिजे. उत्तुंग ध्येय समोर असले पाहिजे. या समाजाला आत्मश्लाघेतून बाहेर काढण्यासाठी समाजातील महानतेचा साक्षात्कार करून दिला पाहिजे व या महान जाणीवा त्याला क्षुद्र स्वार्थापासून दूर करतील. असे तत्वज्ञान स्विकारल्यानंतर त्यासाठीची कार्यपद्धती निश्चित केली.
ती उद्याच्या लेखात.
सुनील देशपांडे.
Article (20/n)
Photo courtesy Google.
Comments
Post a Comment