यशस्वी कार्यपध्दतीचा धांदोळा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ* 

 *यशाची कारणमिमांसा.*

संघ यशस्वी झाला कि नाही, हा अता चर्चेचा विषय राहिला नसून संघ यशस्वी का व कसा झाला? याचा विचार करणे आवश्यक आहे. याचे कारण असे आहे की जसे खेळात एखादा खेळाडू यशस्वी झाला कि त्याने अभ्यास करायचा असतो तो मला यश का मिळाले? या गोष्टीचा. ही विकेट कशी मिळाली, हा पाॅईंट कसा मिळाला व.

तसेच ध्येयपूर्तीकडे प्रवास करणार्या संघालाही विजयाच्या कारणांची मिमांसा करणे आवश्यक आहे.

त्रयस्तांना, विरोधकांना आवश्यकता असेल अथवा नसेल पण संघ स्वयंसेवकांसाठी मात्र विजयाची मिमांसा अत्यावश्यक आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे जगातील एकमेव असे संघटन आहे की त्याचा हेतूच संघटनेसाठी संघटना हा होता. देशासमोरचे प्रश्न समजण्यासाठी, सोडवणे तर दूरच फक्त समजण्यासाठी सुध्दा समाज संघटित असणे आवश्यक होते. हे संघाचे म्हणजे संघ संस्थापक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांचे मत होते. देशाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न होता पण मुळात त्यासाठी खरा प्रश्न होता, देश परतंत्र का झाला? याचे उत्तर होते कारण समाज संघटित नव्हता.

पण समाज संघटित नव्हता म्हणजे काय होते? तर संपूर्ण समाज एका दिशेने विचार करत नव्हता, एक समयावच्छिते करून कृतिशील करत नव्हता, व सार्वत्रिक कृती करत नव्हता. आपल्यातील गुणांबाबत अनभिज्ञ होता, जसे  कस्तुरी बेंबीत असूनही जगभर सुवास शोधत हिंडणार्या हरणासारखा, पण स्वत:मधील दोषाबाबत मात्र आत्मताडण करण्यात आघाडीवर होता.

अशा स्थितीतील समाज आपले स्वातंत्र्य मिळवू शकणार होता की टिकवू शकणार होता? त्यासाठी आवश्यक होते ह्या समाजाने संघटित होऊन विचार व कृती करण्याची.

त्यासाठी डॉ केशव बळीराम हेडगेवार यांनी संघटन म्हणजे काय याचा विचार केला व ते कसे करायचे हेही ठरवले. व आपल्या सार्वजनिक समाज जीवनाचा सर्व अनुभव कनवटीला बांधून त्यांनी हे संपूर्ण समाज संघटित करण्याचे असिधारा व्रत स्विकारले.

सुनील देशपांडे.

Article (21/n)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन