राष्ट्र संक्लपनेचे चिंतन

लेखांक ९*

स्वातंत्र्य संग्रामाची लगबग, धावपळ, अन्य विचार नाही, अशा स्थितीमध्ये सुरवातीचे नेतृत्व होते. अत्यंत विद्वान, तल्लख बुध्दीचे, बहुआयामी प्रतिभेचे सर्व नेते हे स्वातंत्र्यासाठी सर्वस्व झुगारून देऊन उभे होते. यातील एक गणमान्य प्रकांड ज्ञानी, तरीही सामान्य जनतेने आपला मानलेला नेता म्हणजे लोकमान्य टिळक.

गणिती होते, संस्कृत पंडीत होते, पत्रकार होते, वकिल होते, वेदाभ्यासक होते व कृतिशील राजकारणी, समाजकारणी होते. पण टिळक व या सर्वांना तत्कालीन ध्येयाने जखडून ठेवले होते. दिशादर्शन केले पण स्वातंत्र्य लढा सोडून अन्य विषयांना १००% न्याय देणे या नेतृत्वाला शक्य नव्हते. व त्यामुळे समाजाच्या स्वत्वाची, समाजाला सातत्याने स्मरण देण्याची आवश्यकता होती. ती रचना समाजात शिल्लक राहिली नाही.

त्यामुळे बुध्दीभेदाच्या इंग्रजी कुटील खेळासमोर संपूर्ण स्वातंत्र्य चळवळ हतबुद्ध झाली. लो टिळक यांनी बद्रीप्रसाद टुलधरीया यांच्या दैशिक शास्त्र या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेतील दीर्घ स्वरूपाचे राष्ट्र संक्लपनेचे चिंतन सोडता अन्य कुठेही राष्ट्र, त्याचे जैविक स्वरूप, त्याची सांस्कृतिक ओळख ही चर्चेत व लढ्याच्या केंद्रस्थानी आली नाही.
 

परंतू या वातावरणातही हा देश, संस्कृती, सनातन जीवन, समाजाचे जीवन उद्दिष्ट, व गोष्टींचा विचार काही लोक करत होते. व त्याचा प्रभाव या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षावर पडला आहे .

ते पुढील लेखांपासून पाहू यात.


सुनील देशपांडे.

Article (10/n)

Photo courtesy Google.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन