राष्ट्र संक्लपनेची मांडणी.
लेखांक १०*
जे संपूर्ण आयुष्यभर स्वातंत्र्य लढ्यात होते अशा महापुरुषांच्या गुणवत्ता व त्यांचे योगदान यांचं स्मरण केले तरीही या राष्ट्राच्या महानतेचा, येथील विश्व वंदनीय संस्कृतीचा, येथील सनातन काळापासून चालत आलेल्या सातत्यपूर्ण समाज जीवनाचा जेवढा अभ्यासपूर्ण संस्कार समाजात संक्रमित करणे आवश्यक होते, ते होऊ शकले नव्हते.
अशा वेळी हे असिधारा व्रत ज्यांनी खांद्यावर उचलले त्यांच स्मरण अत्यावश्यक आहे. कारण त्यांनी जे मूलभूत काम केले त्या डोलार्यावर या ७५ वर्षांतील सुखद परीवर्तन उभे आहे.
यात प्रामुख्याने समावेश होतो योगी अरविंद यांचा. अलीपूर कटातील एक आरोपी असलेले स्वातंत्र्यसैनिक अरविंद पाॅंडीचेरीला गेले व भारतीय संस्कृती, सनातन संस्कृतीमधील समृध्द वारसा व या संस्कृतीचे वैश्विक तत्वज्ञान, संपूर्ण मानवजातीला गवसणी घालणारे आध्यात्म, व त्या आधारे स्वतंत्र भारताची विश्व सौहार्दतेतील भूमिका अधोरेखित केली. आजची आमची वैश्विक भूमिका ही त्या भक्कम तत्वज्ञानावर उभी आहे.
१५ ऑगस्ट रोजी झालेली फाळणी ही वज्रलेप नाही हे या महापुरुषाने १९४७ च्या निबीड अंधकारातही आम्हाला सांगितले होते. फाळणी अनैसर्गिक आहे म्हणून ती टिकणार नाही हा आत्मविश्वास जागवला. आर्य बाहेरुन आले हा आक्षेप भारताच्या दक्षिण टोकाला बसून खोडून काढला. हिंदूना हतबुद्ध करणारे सर्व युक्तिवाद अत्यंत सकारात्मक पध्दतीने मोडून काढले व हिंदू मनात सकारात्मक चेतना जागवली. या जोरावर भारतमातेला आज विश्वगुरूपद खुणावत आहे.
स्वामी विवेकानंद यांनी तर वैश्विक एकात्मतेचा हिंदू मसुदाच शिकागोच्या धर्मसभेत मांडला व अपमानित हिंदू समाजाच्या स्वातंत्र्याकांक्षेला विश्व उध्दाराचे परीमाण मिळवून दिले.
भगिनी निवेदिता यांनी स्वातंत्र्य लढ्याला अध्यात्मिक परीमाण दिले. १९०६ व १९४७ दोन्ही फाळणीतील फरक एकच होता कि आईची भावना होती वा नव्हती. हा आध्यात्मिक भाव म्हणजे भगिनी निवेदिता.
अशी अनेक नावे स्मरावी लागणार आहेत. त्यातील विवेकानंद यांच शिकागो भाषण व त्याचे या ७५ वर्षांवरील परीणाम हे आपण
स्वतंत्र लेखात पाहू.
या विषयातील एक महत्वाची व्यक्ती आपण स्वतंत्र अभ्यासणार आहोत.
सुनील देशपांडे.
Article (11/n)
Photo courtesy Google.
Comments
Post a Comment