राष्ट्राचे वैश्विक चिंतन

लेखांक ११*

विवेकानंद यांचे शिकागो धर्मसभेतील भाषण एवढे महत्वाचं का आहे कि ज्याचे स्मरण स्वतंत्र भारताच्या ७५ वर्षांसाठी आवश्यक आहे.

विवेकानंद हे कोणाच्याही कवेत माऊ न शकणारे व्यक्तिमत्व आहे. तसेच प्रत्येकाला प्रेरणा देण्याची क्षमता ही स्वामीजींमध्ये आहे.

त्यामुळे स्वामीजी 'मला समजले तसे' या स्वरूपात प्रत्येकाकडून समोर मांडले जाणार आहेत.

माझ्यासमोरील स्वामीजींचे जीवित कार्य कोणते?
११ सप्टेंबर. ज्या दिवशी स्वामीजींनी भारताचे वैश्विक चिंतन जगासमोर ठेवले व भारतमाता ही जन्माता का आहे हे सर्व जगाला समजावून सांगितले.


जगासमोर वैश्विक एकात्मतेसाठी ख्रिश्चॅनिटी, इस्लाम व नवजात बालक अवस्थेतील कम्युनिझम असे तीन पर्याय होते. पण तिन्हीतही एकच साम्य होते की सर्व जगाने माझा मार्ग स्विकारला की वैश्विक एकात्मता होईल. ज्याच्या मर्यादा जगाला समजल्या होत्या.

अशावेळी भारतभूमी मध्ये सिध्द झालेले हिंदू तत्वज्ञान हे वैश्विक तत्वज्ञान आहे व त्यायोगे संपूर्ण जग शांतीमय सहजीवन जगू शकते हे स्वामीजींनी मांडले.

इतरांचे अस्तित्व फक्त सहन करणे नाही तर त्याचा आदर करणे ही हिंदुत्वाच्या सहजीवनाची पूर्व अट आहे. म्हणून वेगळेपण हे सौंदर्य आहे हे स्विकारले तरच सहजीवन शक्य आहे व भारताने हे हजारो वर्षांपासून सिध्द केले आहे. शस्त्र नाही तर वस्त्र व ज्ञान या आधारे जग जोडले आहे.

हे सहजीवनाचे विश्वचिंतन ११ सप्टेंबर ला स्वामिजींनी मांडले व न थांबणार्या टाळ्यांच्या कडकडाटाने हे सत्य पटले हे विद्वत सभेने मान्य केले.

ज्यावेळी भारत हा पराभूत, मागास व आत्मश्लाघेने ग्रस्त होता त्यावेळी ही संजीवनी अवतरली होती. आज हे तत्वज्ञान आधुनिक शांत सहजीवन जगणारे विश्वस्वप्नांचे पायाचे चिरे बनले आहेत.

हे स्वामी विवेकानंद यांचे कार्य माझ्यासाठी सर्वात मोहीनी घालणारे कार्य आहे.

स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांवर प्रभाव टाकणारे जे चौकोनी चिरे आहेत त्यातील एक महत्त्वाचा चिरा म्हणजे ११ सप्टेंबर व शिकागो धर्म संसदेतील स्वामिजींचे भाषण.

सुनील देशपांडे.

Article (12/n)

Photo courtesy Google

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन