संघटित समाज म्हणजे काय?
लेखांत २२*
*संघ यशाची कारणमिमांसा*
संघटनेसाठी संघटना या कारणाने संघ सुरू झाला. पण संघटन म्हणजे काय? हे समाजाला नीटसे माहिती नव्हतं. त्यामुळे एखाद्या कामासाठी स्वयंसेवक दळ एवढाच संघटन शब्दाचा व्यवहारीक अर्थ समाजाला माहिती होता. पण डॉ हेडगेवार यांनी समाज संघटन म्हणजे एका दिशेने विचार करणारा समाज, एकसमयावच्छिते करून कृति करणारा, एकाच वेळी सार्वत्रिक कृति करणारा, स्व विषयी पूर्ण आत्मभान असलेला असा समाज म्हणजे संघटित समाज.
संघाने वरील भूमिकेतून एकारल्या पध्दतीने, इतर सर्व तात्कालिक मोह बाजूला सारून समाज संघटन सुरू केले.
यावेळी उद्देशापासून फारकत घेण्यासाठी सर्वात मोठा मोह आला, फाळणी. फाळणी थांबवण्यासाठी संघर्ष केला असता व संघटन विषय सोडला असता तर... पण संघाने तसे केले नाही. 'अर्ध्य तज्यते पंडित:' असे सूत्र ठेवले.
दुःख झाले, संताप झाला, रागवारागवी झाली पण सर्वजण फाळणीग्रस्तांच्या मदतीला लागले. पुनर्वसन सुरू झाले. पण हिंदू संघटन हे मूळ उद्दीष्ट सुरूच राहिले. आज त्या निरश्रितांना जम्मु काश्मिरमध्ये स्वत: ची घरे मिळत आहेत. संघटित समाज हेच समस्येचे उत्तर होते.
पूर्वांचलात असे क्षेत्र नव्हते, जिथे फुटिरतेचे फुत्कार उमटत नव्हते पण शांत डोक्याने, सेवेच्या साधनेने ' विद्रोहाला शमयू या' या भूमिकेतून संघाने पिढ्यान पिढ्या खपवून आज तेथे एकात्म राष्ट्र भाव उभा केला आहे. परीवर्तन दिसत आहे पण कर्ते? भैय्याजी काणे, मधु लिमये, प्रमोद दिक्षित, व अनेक अनामिक, नावे माहिती पण नाहीत, पण परिणाम स्पष्ट दिसतो आहे. हा आहे संघटनेसाठी संघटना या मंत्राचा दृश्य परीणाम.
अशी शेकडो एकल विद्यालये पुर्वांचलामध्ये चालू आहेत, व अशीच शेकडो प्रकारची सेवा कार्ये चालू आहेत. परिणाम विद्रोह क्षमून भारत माता की जय हा जयघोष पुर्वांचलात ऐकू येत आहे.
पण संघटना याचा वर सांगितलेला अर्थ सर्वाथाने सिध्द केला तो अयोध्या आंदोलनाने.
संपूर्ण समाजाने एका दिशेने विचार, सार्वत्रिक कृति, ( भारतातील प्रत्येक भागातून प्रतिनिधित्व), व एकसमयावच्छिदे करून कृति केली. खर्या अर्थाने संघटित व संवेदनशील समाजाचे दर्शन घडविले.
संघ उद्देशापासून विचलित झाला नाही म्हणून ९५ वर्षांनी ही यशोगाथा लिहिता येत आहे.
एकेका पैलूचा विचार पुढे करू यात. संघ यशाच्या कारणमिमांसेमध्ये.
सुनील देशपांडे
Article (23/n)
Photo courtesy Google.
Comments
Post a Comment