समाज सुधारणेची पूर्व अट - संघटन
लेखांक २७*
*संघ यशाची कारणमिमांसा*
समाज संघटित करण्याचा स्वाभाविकपणे राष्ट्रीय प्रश्नांवर समाज सहभाग म्हणून काय परीणाम झाला हे आपण पाहिले.
पण यामध्ये समाजामध्ये जी स्वाभाविक देशभक्ती असते त्याचे जागरण त्या मानाने सोपे असते. पण ज्या सामाजिक दोषांनी ही दुर्दैवाची परीस्थिती आलेली असते ते दूर करणे, कमी करणे, दाहकता कमी करणे, हे कठीण कर्म असते. पण त्या कामासाठी सुध्दा PRE CONDITION ही प्रथम समाज संघटन हीच असते हे डॉ हेडगेवार यांनी जाणले व स्थायी स्वरूपाच्या समाज परीवर्तनासाठी समाज संघटन हाच पर्याय निवडला.
काय प्रक्रिया घडली? संघ हिंदू संघटन करत चालला होता. हिंदू समाजात स्वत्व व स्वाभिमान जागा करत होता पण आत्मश्लाघा, व समाजाला अपमानित करत नव्हता, इंग्रजांना देवदूत मानून आईला लाथाडत नव्हता.
प्रथम संघाने कुरीतींना हात घातला नाही कारण यात समाजातील दोन वर्गात द्वैत निर्माण होणार होते. मग निवडले कोणते दोष?
आम्ही दैववादी बनलो आहोत, कृतिशीलता विसरलो आहोत. हा दोष पूर्ण समाजाचा होता न की एखाद्या जातीचा. सर्व समाजाला पटले. सर्व देव देवता शस्त्रसज्ज मग आम्ही पराक्रम विन्मुख का? सर्व समाजाला पटले. व त्याचवेळी आमचे दोष आमच्या विशाल संस्कृतीचे वैभव न पेलणार्या आमच्या स्खननशील समाज जीवनात आहे हे ही पटवून दिले. समाज म्हणून प्रथम ताठ झाला , क्रियाशील झाला, पराक्रमी झाला, विजूगिशी झाला. इंग्रज गेले व समाज अधिकाधिक विचारशील व कार्यप्रवण झाला.
साधु, संत व समाजाने १९६४ साली प्रतिज्ञा केली न हिंदू पतितो भवेत, सर्वे हिंदवा सहोदरा. हि होती संघाची समाज परिवर्तनाची कार्यशैली. विश्व हिंदू परिषद.
आणि समाजाने प्रतिज्ञा केली न हिंदू पतितो भवेत, सर्वे हिंदव: सहोदरा. समाज दोष दूर करायचे असतील तर आधी तत्त्वज्ञान पातळीवर चौकट उभारावी लागते. ती ही चौकट होती.पण फक्त तत्त्वज्ञानाने भागत नाही तर त्या दोषाची जाणीव निर्माण करावी लागते, परपिडा अनुभवावी लागते. दोष दूर करण्यासाठी प्रायश्चित करावे लागते.
यातून आली सेवाकार्यांची मालिका. अनुभूती व दाहक वास्तव्याचा अनुभव. संपूर्ण समाजाला त्यात सामावले, मी नाही आम्ही हा भाव जागवला.
आमच्यातील काहींना शिक्षणाचा अधिकार नाही? सत्य समजले, कार्यप्रवण समाजाने कृति सुरू केली. शाळांमागून शाळा सर्वांसाठी सुरू झाल्या. सर्वांसाठी मंदीर प्रवेश नाही तर राम मंदीर आंदोलन सर्व हिंदू समाजाने एकत्रित लढवले. दलित बांधवाने शीला न्यास केला, उपेक्षित बंधू धार्मिक कार्याचे पुरोहित बनले.
हे कसे घडले? कोणत्या समाज सुधारकाला उपेक्षितांना प्रतिष्ठितांबरोबरीचे हक्क मिळवून देता आले होते? हे काम फक्त हिंदू समाजालाच करणे शक्य होते, म्हणून समाज जागा केला, स्वाभिमानी केला, व मग समाजाने सांगितले सर्वे हिंदव सहोदरा.
म्हणून चीरस्थायी स्वरूपाचे समाज परीवर्तन घडत आहे. ही आहे समाज परीवर्तनाच्या संघ यशाची कारणमिमांसा.
अशीच संघयशाची कारणमिमांसा करू या.
सुनील देशपांडे.
Article (28/n)
Photo courtesy Google.
Comments
Post a Comment