भारतीय स्वातंत्र्याचा अन्वयार्थ

लेखांक २*

भारत स्वतंत्र झाला म्हणजे काय झाले? हा यक्षप्रश्न या देशातील हिंदू या राष्ट्रीय समाजासमोर उभा राहिला. फाळणी झाली, भूभाग गेला, नेतृत्वावर बिसंबून बसलेल्या समाजाची अब्रू गेली, सर्वस्व गेले. पण हे सर्व घालवून काय मिळालं? या देशाला, अथवा समाजाला.

ओळख? नाही, प्रतिष्ठा? नाही, एवढेच कशाला, काल परवा ३७० हटेपर्यंत अस्तित्व सुध्दा नाकारला गेलेला हिंदू समाज येथे अस्तित्वात होता. तमस सारख्या हिंदू समाजाच्या भळभळणार्या दुःखावर मीठ लावणार्या कादंबर्या व लेखक भीष्म सहानी सारखी माणसं आमच वैचिरिक नेतृत्व करत होते. स्वतः चे सर्वस्व गमावलेल्या समाजाला सेक्युलॅरिझमच्या आफूची गोळी पाजून झोपवायचा प्रयत्न होत होता.

तरी भांगेत तुळस असावी असे गोपीनाथ बारडोईली सारखे नेते आसाममध्ये होते म्हणून आसाम तरी पूर्व पाकिस्तान होण्यापासून वाचला. पण या ७५ वर्षाच्या इतिहासात हे नाव कोणी वाचल? नाही. अभ्यासक्रमात एखादी ओळ? नाही.


फाळणी भयंकर होती हे ही विसरता आले असते जर भारतात राष्ट्रीय नेतृत्व आले असते तर. पण काळोखी रात्र संपायची होती. फाळणीतील unsung heroes चे स्मरण व त्यांच्या राखेला चिरा व पणती मिळायची होती.
स्वत्वहीन नेतृत्व चीर विजयी समाजाची कशी ससेहोलपट करतो हे अजून स्पष्ट समजून घेऊ या पुढील लेखात.

सुनील देशपांडे

Article (2A/n)
Photo courtesy Google

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन