राष्ट्रव्यापी काम
लेखांक ३१*
*संघ यशाची कारणमिमांसा*
संघाची स्थापना राष्ट्र या संकल्पने भोवती झाली असल्यामुळे संपूर्ण राष्ट्र व सर्व समाज हाच डोळ्यासमोर ठेवून कार्यपध्दती, कार्यक्रम व अग्रक्रम ठरवले गेले व त्यामुळे संघटनेला ध्येयप्राप्ती करता आली. यात कोणत्या कार्यपध्दतीमुळे हे यश आले हे आपण पहात आहोत.
यातीलच एक बारकावा आज पाहू या. संघाला राष्ट्र हितासाठी संपूर्ण हिंदू समाज संघटित करावयाचा होता व तो समाज तर संपूर्ण देशभर पसरलेला होता. त्यामुळे डॉ हेडगेवार यांनी संघ शाखेचे जाळे हे भौगोलिक राष्ट्र डोळ्यासमोर ठेवून उभारले.
सोपा मार्ग सोडून कठीण मार्ग अंगिकारला. डॉ हेडगेवार हे विदर्भातील नेते होते. त्यामुळे नागपूर व परीसरात शाखा वाढवून तरूणांची टोळकी जमवणे हे डॉ हेडगेवार यांना सहज शक्य होते. पण डॉ हेडगेवार हे सोयीने नव्हे तर ध्येयवाद पूर्ततेसाठी कार्यपध्दती उभारत होते. म्हणून नागपूर नंतर थोडाफार विदर्भ, नंतर पुणे, सांगली, पंजाब, मध्य भारत, असे काम वाढवण्यासाठी तरूण मुलांना पाठवण्यास सुरुवात केली व कार्यपध्दती जिंकली. १९४० साली डॉक्टरांनी शेवटच्या बौद्धिक वर्गात हे वाक्य उच्चारले की मी हिंदूराष्ट्राचे छोटेसे स्वरूप पहात आहे. व पहाता पहाता संघ सर्व देशव्यापी बनला.
प्रथम प्रार्थना हिंदी, मराठीत होती , पण ती १९३९ साली संस्कृत करण्यात आली व हे भाव जागरण झाले कि संस्कृत ही भारत जोडणारी भाषा आहे. सर्व भारतीय भाषांची खरी मैत्रिण व सर्व समाजाला परिचित व आत्मिय असलेली भाषा आहे.
आधी मारूतरायांचे स्मरण असलेल्या पार्थनेत फक्त राष्ट्र देवते चेच स्मरण ठेवले गेले.
जे ध्येय तशीच कार्यपध्दती.
जसे ध्येय तसे वर्तन हेच या रचनेमुळे जाणवले. व याचा अनुभव वारंवार घेता आला. जसे राष्ट्रव्यापी काम म्हणून कार्यविस्तार अवघड रस्त्याने केला तसेच संस्कृत पार्थनेचा स्वीकार, दैवत एकच फक्त राष्ट्र न कि एखादे उपास्य दैवत.
ध्येयवाद सुसंगत कार्यपध्दती यात तडजोड न केल्यामुळे हे यश प्राप्त झाले. ही संघ यशाची कारणमिमांसा आहे. असेच अजूनही अस्पर्श पैलू पुढील भागात.
सुनील देशपांडे.
Article (33/n)
Comments
Post a Comment