संघ यशातील कुटुंब रचनेचे महत्त्व
लेखांक ३२*
*संघ यशाची कारणमिमांसा*
संघाच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपध्दतीमुळे संघ यशस्वी झाला आहे. यातील एक म्हणजे संघ ही संस्था नसून कुटुंब रचना आहे. पण हे ढोबळ वर्णन झाले. कुटुंब व्यवस्थेला संघाने कसे स्विकारले. कोणते गुणदोष संघाने स्विकारले. व ध्येयवाद यशस्वी होण्यासाठी ह्या कार्यपध्दती मधील कुटुंब रचना कशी काम करते हे पहाणे औच्छुक्याचे ठरेल.
वरकरणी कुटुंब रचना म्हणजे कुटुंब प्रमुख निवडता येत नाही तर ती त्या प्रमुखाची निर्मिती असते. पण संस्था जीवनात त्याला मर्यादा असतात. संघातही सरसंघचालक हे कुटुंब प्रमुख त्यामुळे त्यांची निवडणूक नाही, पण संस्था प्रमुख हे निवडून आलेले सरकार्यवाह असतात. पण ही तांत्रिक बाब आहे.
पण मग ध्येयपूर्तीसाठी कार्यपध्दती व कुटुंब रचना यांत संबंध काय आहे? कुटुंबात मत विभाजन नसते. त्यामुळे जिंकणे हरणे नसते, व म्हणून ज्याचा निर्णय त्याने पहावे हा त्रयस्तपणा नसतो.
हा भाव कळण्यासाठी एक उदाहरण पाहू. एक ठराव केंद्रीय प्रतिनिधी सभेत चर्चेला आला व त्यात श्री बाबाराव भिडे यांनी मत मांडले. By adopting this resolution, we are deceiving ourselves.म्हणजे ठरावाला विरोध. मतदान घेतले गेले. बाबांसह सर्वांनी हात वर केले व ठरावाला पाठिंबा दिला. बाबा भिडे यांना विचारल्यावर ते म्हणाले चर्चेत मतप्रदर्शन, पण निर्णय मात्र एकमताने. कारण तो ठराव सर्वांना मिळून यशस्वी करायचा आहे. ही ती कुटुंब रचना.
विवेकानंद केंद्राने संघ नाही, शाखा नाही फक्त शिक्षणाचा ध्यास घेऊन परिवर्तन केले. संघ नाही तरी प्रचारक जात राहिले. ही कुटुंब रचना.
कुटुंब संकटात तरत व विजयात फुलत ते या गुणांमुळे. म्हणून आणिबाणीच्या संकटात संघाचे तारू भरकटले नाही वा फुटल नाही. कशाला जेपींच्या आंदोलनाला सहकार्य केले हा प्रश्नच पडला नाही, तर उलट आलेले संकट संधीत कसे बदलू हीच भावना प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात होती. ही ती कार्यपध्दती यशामधील कुटुंब रचनेची भूमिका. अयोध्या प्रश्र्न, संघबंद्या, मोदींचा स्वीकार, संघाने जेवढे कठीण प्रसंग झेलले तेवढे अन्य कोणीही सोसले नाहीत, पण तरीही संस्थेत फुट पडली नाही कारण हे माझे घर आहे हा भाव जागवला होता. जेवढे संकट गडद तेवढा बंधुभाव जास्त. व त्या अर्थाने संघ ही कुटुंब रचना आहे.
मनाविरुद्ध वर्तन सुध्दा सहजपणे करायचे. संघाचे सरकार्यवाह राहिलेले एकनाथजी रानडे विवेकानंद केंद्राचे निर्माते बनले, पुर्वांचल भारत हे कार्यक्षेत्र ठरवले व पहिला नियम बनला हिंदू नाही, संघ नाही. पण म्हणून संघात संशय नाही निर्माण झाला. तरीही प्रचारक जात राहिले, कारण पुर्वांचल फुटीरतेतून बाहेर काढायचा होता. सर्व जण समजूतदारपणे संघाचे नाव न घेता प्रचारक जात राहिले. एका कुटुंब रचनेशिवाय हे घडले असते?
मन मारूनही पण ध्येयवादच जिंकू द्यायचा. कमवत्या मोठ्या मुलाने व सुनेने हौसमौज मारायची पण बहिणीचे लग्न लावून द्यायचे हीच ती कुटुंब रचना संघ यशाच्या कारणमिमांसेमधील महत्वाची भूमिका पार पाडते.
हे व असेच पैलू पुढील भागात.
सुनील देशपांडे.
Article ( 33/n)
Photo courtesy Google.
उत्तम विवेचन
ReplyDelete