स्वत्व जागृती व पराभूत मानसिकतेचा त्याग.

लेखांक २३* 

*संघ यशाची कारणमिमांसा* 
 

संघाने हिंदू समाज संघटित केला म्हणजे तो हिंदू म्हणून अभिव्यक्त होऊ लागला, कृती करू लागला, ती कृती एकाच वेळी व सर्वदूर करू लागला. पण त्याच बरोबर आणखीन एक गुणात्मक फरक अर्वाचीन काळात,  हिंदू समाजात संघाने निर्माण केला कि ज्यामुळे हिंदू समाज कृतिप्रवण बनला.
त्याचा वेध घेऊ या.

आत्मविस्मृत हिंदू समाजाला स्वत्वाची जाणीव निर्माण करून दिली. समाज पुरुषाला पराभूत मानसिकतेतून बाहेर काढून विजयाकांक्षी ध्येयाचे स्मरण करून दिले. हिंदू समाजातील चैतन्याला जागे केले. 

यासाठी इ़ंग्रजांनी केलेली इतिहासाची मांडणी व यशस्वी म्हणून बरोबर या धोरणाने त्यांच्या ज्ञानाच्या कच्छपि लागलेल्या बुध्दिजिवी परंतु समाज धुरीणींच्या आत्मश्लाघा करण्याच्या धोरणापासून हिंदू समाजाला मुक्त केले व हिंदू समाजाला त्याच्या ध्येयाचे स्मरण करून दिले.

एकच प्रसंग उदाहरण दाखल घेऊ. भारताची इंग्रज सरकारने १९०६ साली फाळणी केली. बंगालची फाळणी म्हणून आपण ओळखतो. पण राष्ट्रीय नेतृत्वाचे आत्मभान, भगिनी निवेदिता यांच्या सारखे सांस्कृतिक भारत जाणणारे धार्मिक नेतृत्व व विजिगिषू हिंदू समाज यांनी संघर्ष केला, वंदे मातरम् हा मंत्र जागला. व १९११ ला फाळणी रद्द झाली.

पण त्याच समाजाला आत्मताडणाची सवय लावून, स्वतःविषयी गौरव वाटण्याऐवजी लज्जाभाव कसा वाटेल या व्यापक इंग्रजी कटाला, इंग्रजांच्या यशवैभवाला भुललेल्या समाजधुरीणींच्या सहकार्याने, कट्टर इस्लाम म्हणजे राष्ट्र संकल्पना नाकारणे हे धोरण स्विकारलेल्या मुस्लिम अतिरेकी नेतृत्वाला शरण जाऊन, हिंदू समाजानेच हिंदूत्वाचा घात केला व १९११ साली रोखलेली फाळणी १९४७ साली बिनबोभाट दामदुपटीने स्विकारली.

द्रविड वेगळे, आर्य आक्रमण, हिंदू समाज दोषांच्या परीक्षणासाठी भिंगाखाली व मुस्लिम समाज दोषाला मात्र धार्मिक स्वातंत्र्याचे सोवळे नेसवून संरक्षण. मग स्वाभाविक गोष्ट घडली कि जी हिंदूपण ही शक्ति होती तिच समाजाला लोढण आहे हे भासवले गेले. 

प्रात: स्मरण
कराग्रे वसते लक्ष्मी:, करमध्ये सरस्वती ।
कर मूले तु गोविन्द:, प्रभाते करदर्शनम ॥१॥

पृथ्वी क्षमा प्रार्थना-
समुद्रवसने देवि ! पर्वतस्तनमंड्ले ।
विष्णुपत्नि! नमस्तुभ्यं पाद्स्पर्श्म क्षमस्वे ॥२॥

ब्रह्मा मुरारीस्त्रिपुरांतकारी
भानु: शाशी भूमिसुतो बुधश्च ।
गुरुश्च शुक्र: शनि-राहु-केतवः
कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम ॥३॥

सनत्कुमार: सनक: सन्दन:
सनात्नोप्याsसुरिपिंलग्लौ च ।
सप्त स्वरा: सप्त रसातलनि
कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम ॥४॥

सप्तार्णवा: सप्त कुलाचलाश्च
सप्तर्षयो द्वीपवनानि सप्त
कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम ॥५॥

पृथ्वी सगंधा सरसास्तापथाप:
स्पर्शी च वायु ज्वर्लनम च तेज: 
नभ: सशब्दम महता सहैव
कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम ॥६॥

प्रातः स्मरणमेतद यो
विदित्वाssदरत: पठेत।
स सम्यग धर्मनिष्ठ: स्यात्
संस्मृताsअखंड भारत: ॥७॥
हिंदूत्व व राष्ट्रियत्व या विषयी भावजागरण करण्याच्या नित्य प्रयत्नातील एक म्हणजे प्रांत:स्मरण. भारताचे महानपण, सनातनत्व, विज्ञान, कला, तत्वज्ञान, अध्यात्म, व वैश्विक विचार या गोष्टीतील दैदिप्यमान प्रवास याचे दैनिक चिंतन होतं होते. हे भाव जगरण कृतिशील कार्यकर्ते उभे करत होते.

या पार्श्वभूमीवर १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेच्या सहाय्याने अपमानित, पराभूत, हिंदू समाजाच्या संघटनेचा प्रयत्न सुरू झाला. हिंदू ही अभिमानास्पद ओळख निर्माण झाल्या शिवाय या राष्ट्राचा विराट जागा होणार नाही व तो पर्यंत स्व आधारित स्वातंत्र्य शक्य नाही. ही भूमिका अधोरेखित झाली. या पार्श्वभूमीवर डॉ हेडगेवार यांना तारेवरची कसरत करत हिंदू संघटन करावयाचे होते.

कोणती कसरत करावयाची होती हे पुढील लेखात पाहू.

सुनील देशपांडे.

Article (24/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन