सर्वेषां अविरोधेन

लेखांक ३३

*संघ यशाची कारणमिमांसा*


संघाच्या कार्यपध्दती मधील असे बारकावे आपण पहात आहोत कि वरकरणी ते महत्वाचे वाटत नाहीत पण त्या बीजांमध्येच संघाचे यश दडलेले आहे.

विरोधासाठी विरोध नाही, विरोधकांना प्रत्युत्तर नाही, कुणाचा द्वेष नाही, आमचा मार्ग व त्या वरून वाटचाल. या सर्वाला मिळून एक शब्द संघात परवलीचा शब्द आहे, सर्वेषां अविरोधेन. व जसे संघ कार्यपध्दती मधील बहुतेक बारकावे हे डॉ हेडगेवार यांनी स्वत: च्या कृतींने बीजं रुपानी मांडले.  तेच याही बारकाव्यात घडले आहे.

सर्वच देशभक्तांप्रमाणे डॉ हेडगेवार हे सुध्दा काॅंग्रेसमध्ये राहून स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होत असत. त्यामुळे डॉ हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरू केल्यावर अधिकारवाणीने काॅंग्रेस सेवा दलाचे डॉ हार्डीकर यांनी एक प्रश्नावली पाठवून डॉ हेडगेवार यांच्या कडून संघा संदर्भात स्पष्टीकरण मागितले. त्यावर डॉ हेडगेवार यांनी मार्मिक पण दिशादर्शक उत्तर दिले. प्रश्नपत्रिका मिळाली परंतु आता परीक्षा देण्याचे वय राहिले नसल्यामुळे क्षमस्व.

हिंदू समाज संघटित करण्याचे सकारात्मक काम करण्यात खीळ बसेल असे काहीही करायचे नाही. त्यामुळे प्रथम दुर्लक्ष, व  नंतर संघ विरोध, हे स्वाभाविक म्हणून स्विकारून शक्तिसाधना संघाने सुरूच ठेवली.

प्रश्र्न उभे केले जात होते? हिंदूच का?, मुसलमानांचे काय? हिंदूत्वाची व्याख्या सांगा. हे व असे अनेक. पण याच उत्तर अधिक प्रभावी शाखा, अधिक शक्तिशाली समाज हेच देण्यात आले, जसे जसे  जागरण होऊ लागले तसे तसे, वरील सर्व  प्रश्न आपोआप निरूत्तर होऊ लागले. संघ सर्वदूर पोहोचला व आपोआप दलितांचे काय? आदिवासी हिंदू आहेत का? हे प्रश्नच निकाली निघाले. जर चर्चा करत बसला असता, उत्तरे देत बसला असता संघ, तर ही ऊत्तरे नकारात्मक ठरली असती.

शाखा अनुभूती हेच प्रत्येक शंकेचे, आरोपाचे, विरोधाचे उत्तर ह्या रचनेतून, सर्वेषां अविरोधेन ह्या भूमिकेतून एषा पंथा असा हा संघ शाखा प्रवास सुरू झाला व चालू आहे.
शाखा हेच प्रत्येक प्रश्नाचे, शंकेचे, आरोपाचे उत्तर आहे. ्््््््

जेवढी शक्ती, तेवढीच मांडणी ह्याच धोरणांने प्रवास सुरू राहिला. राम मंदिर विषय १९८४ साली सुरू केला, हिंदू हिताला मत असेच त्या काळात सुरू झाले. आधी नाही. सर्व शक्ति फक्त निर्माणासाठी. रिकाम्या, वांझोट्या  वादविवादासाठी नाही.

आम्हाला काही निर्मिती शक्य नाही, तर निदान संघाला या चर्चेच्या मोहात अडकवून मूळ हेतू पासून दूर नेऊ हे उद्दिष्ट ठेवलेल्या विरोधकांचे प्रयत्न असफल ठरले. 

इतर कुणालाही न जमले ते या कार्यपध्दती मधील बायकाव्यांने करून दाखवले. आरोपाचे उत्तर प्रतिक्रिया नाही तर कृति करून दाखवणे. मग सामाजिक समता असो, सेवा असो , तत्त्वज्ञान असो, राष्ट्रीय एकात्मता असो. ताकद उभी करून कृती करून सकारात्मक पद्धतीने सिध्द करणे हीच कार्यपध्दती यशस्वी ठरली.

असेच अनेक बारकावे पुढील भागात.

सुनील देशपांडे.
Article (34/n)
Photo courtesy Google.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन