प्रथम जागृती व नंतर प्रबोधन.

लेखांक २५* 

*संघ यशाची कारणमिमांसा* 
 

इंग्रजी साम्राज्य ही इष्टापत्ती आहे असे समजणारे काही समाज सुधारक सोडले तर इंग्रज येथे असावेत असे सामान्यपणे कोणासही वाटत नव्हते. परंतु इंग्रज आले आहेत तर त्यांच्या शक्तीचा वापर करून समाज सुधारणा करून घेऊ असे मानणारा मोठा नेतृत्व वर्ग समाजात अस्तित्वात होता. व ही बाब हिंदू समाज स्वाभिमानाने स्वातंत्र्यासाठी उभी करण्यामधे अडचण ठरणार होती.

त्यामुळे डॉ हेडगेवार यांना समाजातील दोषांचे भान ठेवून जागरण करावयाचे होते. म्हणून त्यांनी प्रथमतः ज्या समाज दोषांमुळे इंग्रज येथे स्थिरावले त्यावर काम करण्यास सुरुवात केली.

विस्कळीत समाज म्हणून विस्कळीत आंदोलने होत होती. स्वातंत्र्यासाठी आंदोलने रोज होत होती पण एकाचवेळी देश  उभा रहात नव्हता व संपूर्ण समाजही उभा रहात नव्हता. या साठी शाखेची निर्मिती झाली.

तसेच समाजाची मानसिकता ही पुढार्यांवर सर्व सोपवा व स्वस्थ रहा ही होती. त्यासाठी सुध्दा शाखा हा पर्याय डॉ हेडगेवार यांनी शोधला.

पण यासाठी मुलभूत आवश्यकता होती संपूर्ण समाजाला गवसणी घालण्याची. व जर संपूर्ण समाजाला  कवेत घ्यायचे असेल तर त्याच्या भावविश्वाला समजून घेऊनच त्या बरोबर प्रवास करावा लागणार होता. मग टिळक नितीला पर्याय नव्हता. स्वत्व जागृती हाच आधार बनला.

एखादा मुलगा घरच्या संस्कारामुळे सर्व जातीच्या मुलांबरोबर जेऊ शकत नसेल तर त्याला  परवानगी दिली. पण माणूस तोडला नाही. परीवर्तन आपोआप घडले. बच्छराज व्यास जाती जोखडातून बाहेर पडले व संपूर्ण हिंदू बनले  दोष दूर करण्यासाठी समाज बरोबर तर आला पाहिजे हे ते सूत्र होते.

बच्छराज व्यास कर्मठ घरातून एकात्मिक समाज जीवन असा प्रवास.

समाज बरोबर आला. हिंदूत्व हे राष्ट्रीयत्व हा भाव जागरण झाले. अस्मितेवर पडलेल्या आत्मश्लाघेच्या राखेला दूर सारले गेले. व स्वाभाविकपणे समाजातील कर्तव्य भाव जागा झालेला दिसला.

भाव जागरण प्रथम ही भूमिका अशा प्रकारे योग्य ठरली.

या जागृत समाजाने आगामी काळातील आव्हाने कशी पेलली?, समाज परीवर्तनाची दिशा कशी पकडली? हे पुढील भागात पाहू.

सुनील देशपांडे.

Article (26/n)

Photo courtesy Google.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन