संघ माणसांच्या हिशोबाचे काम. गटपट.
लेखांक ३५*
*संघ यशाची कारणमिमांसा*
माणसांची यादी बनवायची हे संघ यशाच्या कारणमिमांसेमध्ये महत्त्वाचे आहे पण त्याहून महत्त्वाचे आहे माणसांचा हिशोब ठेवणे. हे महाकाय काम भारतात कोणत्या एकाच संस्थेने केले असेल तर ती आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
हे काम संघाने केले कसे व म्हणून संघ यशस्वी कसा ठरला हे पाहू या. संघ शाखेत महत्वाची गोष्ट आहे गटपट व्यवस्था.
त्यातील शाखेत आलेल्या प्रत्येक व्यक्तिची नोंद म्हणजे पट. हा महत्त्वाचा आहे कारण संघ हे संपूर्ण समाजाचे संघटन म्हणून प्रत्येक व्यक्तिची नोंद हवीच पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तिंचा हिशोब. व ते काम करते गट.
हिशोब ठेवणे म्हणजे काय असते? कोण व्यक्ती, काय करते, स्वभाव कसा, गुणदोष, आर्थिक, शैक्षणिक स्थिती, घरची परिस्थिती, जबाबदार्या व.व. हे सर्व माहिती असणे म्हणजे हिशोब.
पैशाचा हिशोब ठेवणारे सगळेच असतात पण माणसांचा असला जगावेगळा हिशोब? ठेवलाय कुणी संघाशिवाय? पैशाचा हिशोब आपण का ठेवतो? कारण तो वापरायचा असतो, गरजा भागविण्यासाठी. संघाने माणसांचा हिशोब ठेवला कारण ही जनशक्ती वापरून समाज संघटित करणे व राष्ट्र उभारणे ही कामे करण्यासाठी.
पण याला जो कार्यपद्धती मधील बारकावा वापरला, गट व्यवस्था ही समजून घेऊ.
यादीतील सात, आठ जणांचा गट करणे त्यातील एकाला प्रमुख म्हणायचे. तो गटनायक. हा छोटा, सामान्य स्वयंसेवक, माणूस म्हणजे या सर्वांचा पालक. त्यांना शाखेत जाताना हाक मारणारा, आला नाही तर भेटायला घरी जाणारा, आजारी असेल तर औषध आणून देणारा, एकत्र या सर्वांचे वनभोजन करणारा, एखाद्य्याच्या मंगल कार्यात टोळी बनवून सहकार्य करणारा, सहकुटुंब सहपरिवार सहली काढणारा, प्रत्येकाला त्यांच्या नकळत छोटी छोटी कामे सांगून कार्यप्रवण करणारा व हे असे सात आठ जणांचे विशाल कुटुंब उभारणारा सामान्य माणूस, स्वयंसेवक म्हणजे गटनायक. या सर्वांसाठी, एवढ्या बारकाईने काम करण्यासाठी सात आठ पेक्षा मोठी यादी देता येईल? नाही ना?
म्हणून संघातील सर्वांत महत्वाचा घटक. याची कार्यक्षमता म्हणजे संघाची कार्यक्षमता.
अशा लाखो गटनायकांनी बनवलेली क्रियाशील कोट्यावधी कुटुंबे म्हणजे समाज संघटना. कुटुंब रचनेतील आत्मिय भाव कोट्यवधीच्या समाजात निर्माण या रचनेने केला. खर्या अर्थाने *वसुधैव कुटुम्बकम्* चा प्रयोग करून दाखवला. म्हणून संघ ध्येय यशस्वी. हा कौटुंबिक आत्मीय भाव संपूर्ण देशात प्रवाहित झाला.
असा आहे हा संघ यश कारणमिमांसेतील महत्वाचा बारकावा. असेच अनेक पुढील भागात.
सुनील देशपांडे.
Article (36/n)
अप्रतिम
ReplyDelete