संघ नियम नाही, संकेतावर चालतो.

लेखांक ३८



*संघ यशाची कारणमिमांसा*



संघ यशाला कारण आहे ही अनोळखी कार्यपध्दती. पण कार्यपध्दती ही प्रत्यक्ष सहभागाशिवाय समजतं नाही म्हणून ह्या बारकाव्यांचे स्पष्टीकरण आवश्यक होऊन बसते. 


संघ कामात बहुतांश गोष्टी या अनौपचारिक आहेत. व त्या अनौपचारिक गोष्टींना, पदांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण ही एक कौटुंबिक रचना आहे. संकेत आहेत, ते कोणी मोडत नाहीत व संकेत नियमांपेक्षा ताकदवान आहेत.


शाखेवर पदाधिकारी मुख्य शिक्षक, कार्यवाह हे असतात. पण न नेमलेला कार्यकर्ता जरा प्रौढ, हा पालक असतो. तो प्रणामाचा अधिकारी नसतो, इतरांसारखा रांगेतच उभा असतो पण कुणाला खेळताना लागल तर, कुणा मुलाच्या घरची सहलीसाठी परवानगी काढायची असेल तर, रागावलेल्या मुख्य शिक्षकाला शांत करायचं असेल तर, बैठक घेण्याची आठवण करायची असेल तर, बैठकीत भेळभत्ता स्वखर्चाने आणायचा असेल तर? मात्र ह्या पालकाने पुढाकार घ्यायचा. हा पालक म्हणजे शाखा वंगण. असे अनधिकृत पालक म्हणजे संघ कार्यपध्दती मधील कणा.


व या पालकाचा सर्वात मोठा आविष्कार म्हणजे सरसंघचालक. मधल्या प्रत्येक रचनेत तो डोकावत असतो. त्याच्या त्यागाच्या धाकात  सर्वकाही सुरळीत चालते. त्याग हा अधिकार मोजण्याचा सर्वात मोठा मापदंड.


अधिकारी म्हणायच पण अधिकार   म्हणजे त्याग अधिक. स्वयंसेवकासाठी रोज एक तास तर मुख्यशिक्षकांने तीन तास खपायचे. स्वयंसेवकाला कमी गुण मिळाले तर या मुख्य शिक्षकाने शिव्या खायच्या. याला त्यागाचे अधिकार. ही आहे संघातील अधिकारी शब्दाची व्याख्या. म्हणून आणिबाणीच्या दुर्धर प्रसंगात शिव्या खात हे (अधिकारी? ) घर, मन व माणस सांभाळू शकली.


घर खर्च चालवण्यासाठी  आवश्यक पैसा वापरायचा व त्याचा जमाखर्च बाहेरच्यांना सांगावा लागत नाही. संघ हे असेच कुटुंब आहे. स्वत: च पैसे जमव व खर्च कर. तू किती पैशाचा त्याग करतोस, तेवढीच फक्त  सुखासीन तुमची शाखा असेल.


सर्व काही अलिखित. फक्त संकेत. आपणच आखायचे, निर्माण करायचे, बदलायचे, मोडायचे. पण संकेत आहेत ते प्रथम पुरूषी एक वचनी पाळायचे.


हा बारकावा आहे कार्यपध्दती यशस्वी करणारा. जबाबदारी, कर्तव्य, त्याग या गुणांनी युक्त शब्द अधिकारी.


म्हणून कार्यपध्दती संघ ध्येय यशस्वीपणे गाठू शकली. ही आहे संघ यशाची कारणमिमांसा.


असेच अजूनही बारकावे आहेत. काही पुढील भागात.


सुनील देशपांडे.

Article (39/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन