संघ वैशिष्ट्य महापुरूषांची राष्ट्रीय ओळख घट्ट केली



लेखांत ३९



*संघ यशाची कारणमिमांसा*



संघ यशस्वी म्हणजे संघाचा ध्येयवाद यशस्वी. व संघाचा ध्येयवाद जसे हिंदू संघटन, राष्ट्र भाव जागरण, एकात्म राष्ट्र व. यासाठी भौगोलिक राष्ट्रीय भावना जागवण अत्यावश्यक होते. हे कसे केले संघाने? कार्यपध्दतीमध्ये काय अंतर्भूत केले? या बारकाव्याला समजून घेऊ यात.


ऐतिहासिक महापुरुषांचे कालोचित स्मरण हे राष्ट्रभाव जागरणाची महत्वाची पूर्व अट आहे. व या जागरणात संघाच्या यशाचे गमक सामावले आहे.


छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, लाचित बडफुकन, बिरसा मुंडा, चोल राजे व. असे राजे, योध्दे, तसेच सर्वदूर पसरलेला भक्ती मार्गाने देश जोडणारा संत संप्रदाय, प्रतिभा संपन्न समाज सुधारक या सर्वांचं राष्ट्रीय योगदान फक्त अधोरेखित न करता ते योगदान समाजात पोहचवले हे ते संघ वैशिष्ट्याचे बारकावे आहेत.

छत्रपति शिवाजी महाराज देशाचे नेते आहेत. काशी विश्वनाथ मंदिर तुटलं तर *सकाळ पृथ्वी* *आंदोळली धर्म बुडाला* असा भाव महाराजांनी मनी जपला, म्हणजे शिवाजी महाराज राष्ट्र चिंतन करत होते. हिंदू भावविश्व व राष्ट्रभाव विश्व हे एक आहे हे ते जाणून होते. तसेच महाराणा प्रतापांनी ओळखले होते हे संघाने समाजापर्यंत पोहचवले. ही विशेषता. छत्रपति शिवाजी महाराज राज्याभिषेक त्री शताब्दी सोहळा महाराष्ट्र नाही तर देशभर गावागावात साजरा झाला. जे जाट मराठी विरोधी मानले जात त्यांचे नेते चौधरी चरणसिंग अध्यक्ष झाले व शिवरायांचे राष्ट्रीय स्थान अधोरेखित केले गेले. राष्ट्र उभारणीसाठी, शिवाजी महाराज हे राष्ट्रमंदीराचा ध्यास घेतलेले नेते होते हे समाजात रूजवले.
लाचित बडफुकन व अशाच राष्ट्र पुरूषांचा परिचय संघाने सर्व देशाला करून दिला. राष्ट्रीय एकात्मतेची ही पूर्व अट होती.


लाचित बडफुकन या आसामी सेनापतीने औरंगजेबाला आसाम मध्ये येऊ नाही दिले हा इतिहास सर्व देशाला सांगितला.


राणी गाइडिंगल्यू ह्या नागा धर्म रक्षक राणीची पंचाहत्तरी पूर्ण देशात साजरी झाली. जगभरातील चर्चसेनेची तगमग सर्व देशाच्या लक्षात आली. विघटनवादी शक्ती उघड्या पडल्या.


शंकर देव महाराज , ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, देशभरातील संत, चोलांचे साम्राज्य, राष्ट्रभक्त समाज हितैषी डॉ आंबेडकर ह्या प्रत्येक महापुरुषाचे राष्ट्रीय योगदान सर्वदूर पसरलेल्या राष्ट्रीय हिंदू समाजाला समजावून सांगितले.


परीणाम या महापुरूषांना संकुचित करण्याचा इंग्राजळेल्या विचारवंतांचा डाव फसला व हे सर्व महापुरुष राष्ट्र पुरुष म्हणून सर्व देशाच्या ह्रुदयात बसले.


सर्व समाज एकात्म करण्याचे काम झाले. संघ ध्येय यशस्वी ठरले.


असेच अजूनही बारकावे ज्यामुळे संघ ध्येय साकारू शकला हे पुढील लेखात.


सुनील देशपांडे.

Article (40/n)

Photo courtesy Google.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन