संघ पध्दत समाज परिवर्तनाची
लेखांत ४१
*संघ यशाची कारणमिमांसा*
संघाचे ध्येय हिंदू समाज संघटित करण्याचे आहे. संघटित करणे म्हणजे फक्त गोळा करणे नाही तर स्वाभिमानयुक्त व दोष विरहीत एकत्रित करून राष्ट्र पुनर्बांधणी मध्ये सहभागी करून घेणे हे ते संघटन आहे.
यातील स्वत्व जागृती जरा सोपी होती व संघाने ते गतीने करून ही दाखवले. पण दोषमुक्त करणं सोप नव्हत. कारण यात समाजातील दोन घटकातील विसंवाद, संघर्ष, विद्वेष या सगळ्याचा विचार करावयाचा होता.
यावेळी संघ कार्यपध्दतीने जो मार्ग स्विकारला त्यामुळे समाज संघटित करणे म्हणजे फक्त गोळा करणे नाही, फक्त स्वाभिमान जागृत करणं नाही तर समाज दोष दूर करणेही चालू झाले व त्याला यशही येत आहे.
पण हिंदू संघटकांनी कोणत्या बारकाव्याच्या आधारे हे केले. सर्वेषां अविरोधेन म्हणणार्या संघाने हे द्वैत उभारणारे काम कसे केले?
आपण उदाहरणाने जाऊ. श्री गुरुजींच्या एका चार्तुर्वणाच्या मुलाखती वरून महाराष्ट्रात फार वाद झाला. अन्य तपशील सोडून देऊ. श्री गुरुजींनी सांगितलं की दोघांच्या आक्षेपांना उत्तर देऊ. आचार्य अत्रे व नवाकाळचे खाडिलकर. स्पष्टीकरणात गुरूजींनी सांगितले कि या दोघांनी माझी विधाने हिंदू धर्माच्या तत्वविरोधी आहेत, हिंदू दर्शनांचे सहाय्याने सांगितले आहे. पण बाकी सर्वांनी विचारले कोण शंकराचार्य?, कोणता धर्म? त्यांना उत्तरे देऊन वेळ घालवू नये. हे दिशा दर्शन आहे.
तुकाराम महाराजांनी समाजसुधारणा केली, सुईणीसारखी. समाजाचे भावविश्व न नाकारता, पांडुरंग न नाकारता. संघाने हाच आदर्श ठेवला.
आम्हाला तुकाराम महाराजांची टिका हवी आहे कारण जगदगुरूंनी पांडुरंग न सोडता समाज दोष दर्शन घडविले व म्हणून समाजाने ते हळूहळू स्विकारले. ज्यांना बदलवायचे त्यांच्या भावविश्वाशी खेळ नाही करायचा. त्या पांडुरंगाला सजीव मानून, त्याला आर्त साद घालायची ही तुकारामी परंपरा संघाने स्विकारली व दोषदर्शन व दुरूस्तीसाठी समाजानेही स्विकारली.
रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, गुलाब महाराज , नारायण गुरू, तुकडोजी महाराज या मार्गावर जायचे हे संघाने स्विकारले व समाजाने अंगिकारले.
त्यातून निर्माण झाले कि समाजाने स्वत: हून आत्मपरीक्षण करून आत्मोन्नतीचा, दुरूस्तीचा मार्ग स्विकारावा व तो समाजाने स्विकारला. लहान रेषा पुसून नाही तर हिंदूत्वाची मोठी रेषा मारून दोष दुरूस्तीची प्रक्रिया सुरू केली.
संघ यशात ह्या समाज परीवर्तन प्रक्रियेला विशेष, अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा बारकावा असेल पण फार मोलाचा आहे.
असेचि अजून काही पुढील भागात.
सुनील देशपांडे
Comments
Post a Comment