बाबासाहेब पुरंदरे आता नाहीत.

इतिहास संशोधकांमध्ये कर्ता किंवा कार्यकर्ता संशोधक ही संकल्पना फारशी नाहीच. पण हा नवीन प्रकार अस्तित्वात आणणारे पहिले इतिहास संशोधक म्हणजे बाबासाहेब पुरंदरे.

इतिहास संशोधक म्हणून कागद शोधले, वाचले, सत्यता तपासली, विविध भाषा शिकले, तपशीलातील जागा पाहिल्या, काही शोधल्या, पुन्हा पुन्हा भेटी दिल्या, तपशीलातील बारकावे तपासले, शिलालेख वाचले, इतिहासाची सर्व साधने प्रथम पुरुषी एक वचनी हाताळली व नवीन युग कर्ता छत्रपती शिवाजी महाराज यांचे ऐतिहासिक कार्य इतिहास म्हणून नीट जाणून घेतले.
येथे पर्यंतचा प्रवास हा इतिहास संशोधकाचा होता, ग.ह.खरे यांच्या सारखे तपस्वी गुरू होते दिशादर्शक म्हणून. दत्तो वामन पोतदार होते. असे अनेक दिग्गज इतिहासकार एषा सत्या असा अभ्यास करत होते, त्यातील एक म्हणजे इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे होय.
पण येथून पुढे मात्र काही तरी अत्यावश्यक बदल झाला ज्यामुळे बाबासाहेब हे बाबासाहेब पुरंदरे एकमेवाव्दितीय झाले. त्याकडे एक कटाक्ष टाकू या.
कोणताही इतिहास संशोधक जी जोखिम कधीच उचलत नाही ती इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांनी उचलली. कोणताच इतिहास संशोधक स्वतः चे संशोधन ललित अंगाने लिहून स्वतःच्या इतिहास संशोधक या प्रतिष्ठित उपाधीला कमीपणा आणत नाही. ती अप्रतिष्ठा, ती जमीनीवर चार बोटे चालणारे बुद्धिवादी व त्यांचा कंपू यातून चालणारी कुचेष्टा, ऐतिहासिक दस्ताचे महत्त्व नाहीसे करण्यासाठी त्या दस्ताला फक्त मनोरंजन असा दर्जा देऊ पाहणा- यांनी केलेला उपमर्द या सर्वांच्या परे जाऊन त्यांनी शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक स्थान हे सामान्य माणसाला कळेल, समजेल व महत्त्वाचे म्हणजे प्रेरीत करेल असे समजावून दिले. त्याची फार मोठी किंमत त्यांनी चुकवली. पण शाहिरी ढंगानी इतिहास हा सामान्य माणसापर्यंत पोहोचवा.
     ह्या बाबासाहेबांच्या त्यागाचा उल्लेख राहून जाईल म्हणून विस्ताराने स्मरण केले. ५००/१००० प्रतित विचारवंत, इतिहासकार न बनता, लाखो वाचकांना शिव छत्रपती व त्यांचे युगानुकुल महानपण समजावून सांगितले. त्यासाठी या संशोधकाने शाहिर ही पदवी स्विकारली. ह्या पैलुसह बाबासाहेब आपण स्मरूयात. शिव चरित्रात काम केलेला कार्यकर्ता स्मरूयात, दादरा नगर हवेली चा योध्दा कर्ता स्मरूयात, हिंदुत्वासाठी, कोपरगावापासून अयोध्देपर्यंत संचलन केलेला एक स्वयंसेवक स्मरू यात.
हे सर्व करताना महाराष्ट्रातील विव्दत जनात अप्रतिष्ठतील केलेला, बुध्दिहीनतेचा शिक्का मारलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाते कायम जपणारा, त्याची वैयक्तिक आयुष्यात किंमत मोजलेला लढवैय्या अभ्यासक बाबासाहेब स्मरूयात.
असे एक परिपूर्ण बाबासाहेब स्मरूयात.

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन