संघ यशाची कारणमिमांसा समारोप.

लेखांक ४२


*संघ यशाची कारणमिमांसा*


सर्व साधारणपणे सहजपणे ज्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी संघ कार्यपध्दती, तत्वज्ञान, व्यवहार यामध्ये आहेत व त्यामुळे संघ यशस्वी झाला त्या आपण पाहिल्या. त्यामध्येसुध्दा संघ कार्यपध्दतीमध्ये सहभागी न होणार्या समाजाला परीघा बाहेर उभे राहून सुध्दा जी वैशिष्ट्ये सहजपणे जाणवतात ती या लेखमालेमध्ये विचारात घेतली नाहीत.

एखादी यशस्वी संघटना ही का यशस्वी झाली याची मिमांसा करताना ढोबळमानाने तत्त्वज्ञान, त्याच नेतृत्व, दृश्य स्वरूपातील कार्यपध्दती याचाच विचार केला जातो व ती चौकट आहे म्हणून यश मिळाले असं मानलं जातं. 

पण मला प्रयत्नपूर्वक हे लक्षात आणून द्यायचे आहे की यशस्वितेसाठी अन्य अनेक बारकावे काम करत असतात व ते  समजल्या शिवाय यशाची संपूर्ण कारणमिमांसा पूर्ण होत नाही.

स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांचा धांदोळा घेताना या लेखमालेचा अंतर्भाव मला आवश्यक वाटतो. या स्वातंत्र्योत्तर काळात ज्या संस्था व विचारधारेचे देशावर सार्वत्रिक व सर्वात जास्त प्रभाव टाकला आहे, तिच्या निर्मात्याची व त्या संस्थेची सर्वांगिण माहिती व यशस्वीतेची चिकित्सा ही अत्यावश्यक ठरते. राष्ट्रीय विचाराचे मार्गदर्शक नेते, संस्था, कार्य याचे विषयी जी हेळसांड भारतातील राजकीय व सामाजिक नेतृत्वाने केली त्यामुळे तर हे विस्तृत विवेचन आवश्यक बनले होते. म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेचा व डॉ हेडगेवार यांच्या विचार विश्वाचा आढावा आगत्याचा ठरला.

दीर्घकाळ संघटनेत कार्य केल्यामुळे मला झालेले आकलन आपणा सर्वांच्या विचारार्थ ठेवले आहे.

अनेकांनी अभिप्राय, विस्तार सूचना, या आधारे लिखाणातील उत्साह वाढवला त्यांचे ऋणनिर्देश करून, भारतात व काही प्रमाणात जगभर या प्रचंड संस्थेने जी घुसळण केली त्या तुलनेत अपुर्या मिमांसेसह पूर्णविराम देत आहे.

परंतु राष्ट्रीय विचारा आधारे हा स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांचा धांदोळा पुढे चालू ठेवू यात.

सुनील देशपांडे.
Article (4 3/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन