राष्ट्रीय एकात्मतेची ओळख व इंग्रजी कावा
लेखांक ४३*
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचा विचार आपण करत आहोत. यातील स्वातंत्र्याच्या जन्मा बरोबर जी ठसठसती वेदना आपण बरोबर घेऊन वावरत आहोत, त्या फाळणीचा, कारणांचा व राष्ट्रभाव जागरणामुळे त्या काळ्याकुट्ट ढगाला जी सोनेरी किनार लाभली ती आपण पाहिली.
तसेच स्वातंत्र्यपूर्व काळ ते हे शतक ज्या विचारधारेने, कार्यपध्दतीने व कार्यकर्त्यांनी संपूर्णपणे भारून टाकले त्या डॉ हेडगेवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा परिचय व राष्ट्रजीवनावरील प्रभावही समजून घेतला.
गंमतीने असेही म्हणता येईल की तुम्ही स्वयंसेवक असाल, समर्थक असाल, विरोधक असाल, द्वेष्टे असाल पण तुम्ही या देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्था व ध्येयधोरणे यांच्याशी संबंधित असता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यशाबाबत म्हणून असे ही म्हणता येईल की संघाने देशातील प्रत्येक नागरिकाला संघ व राष्ट्र संक्लपना या विषयी विचार करण्यास भाग पाडले.
तसेच या देशातील राष्ट्रीय एकात्मतेची जी हजारो वर्षांपासूनची वीण होती कि जी इस्लामी आक्रमणातही विशविशीत झाली नव्हती. कि जी वीण इंग्लिश सत्ताधार्यांनी बुध्दी जोराने विशविशीत केली नव्हे तर तोडून काढली. त्या विणीची पुनर्बांधणी कशी केली गेली ते पुढील काही लेखांमधून पाहू यात.
राष्ट्र संक्लपने विषयी संभ्रम, आम्ही कोण? या स्वाभिमानी ओळखी विषयी संभ्रम, दैदिप्यमान इतिहासाविषयी संभ्रम, ज्ञान विज्ञान विषयी संभ्रम. अशा सर्वाचा शेवट म्हणून आत्मविस्मृत व हतोत्साही समाज हे दुर्दैव किती भयावह होते व त्याची ही दृष्ट साखळी कशी तुटली, तोडली ते पाहूया.
सुनील देशपांडे.
Article (44/n)
Comments
Post a Comment