संस्कृती राष्ट्र संक्लपनेवर घाला

लेखांक ४४*



भारतात लढाई जिंकता येते पण भारत जिंकायचा असेल तर भारतीय समाज म्हणजे हिंदूपण असलेला समाज मानसिकदृष्ट्या पराभूत झाला पाहिजे हे सर्व प्रथम इंग्रजांनी ओळखले व अतिशय चतुराईने त्यांनी पराभूत हिंदू मानसिकता निर्माण करणे या कार्यास प्रारंभ केला.

हिंदू हे आमच्यासारखेच बाहेरून आलेले आक्रमक आहेत, त्यांनीही येथील एतद्देशीय जनतेला हरवून जंगलात पळवून लावले व. आर्य आक्रमण/ स्थलांतर सिध्दांत. अशा सिध्दांताच्या आधारे समाजात फूट पाडण्याचे दीर्घकालीन प्रयत्न सुरू झाले. उत्तर विरूद्ध दक्षिण भारत, आदीवासी मूलनिवासी तर इतर सर्व उपरे अशी फूट पाडण्याचे डावपेच आखले गेले. 

पराभूत देशातील विद्वानांना आत्मश्लाघा करून घेण्याची आवड असते. व मग विजेते बरोबर व पराभूत चूक. आमच सगळ त्याज, टाकावू हा हिनभाव निर्माण होतो. उघड्या डोळ्यांनी दिसणारे सत्य सुध्दा सहजपणे नाकारले जाते. पराभवाची चिकित्सा करून दुरूस्तीचा अवघड मार्ग न स्वीकारता, विद्वान शरण जाण्याचा सोपा मार्ग स्विकारतात.

यातूनच इतिहास, समाजशास्त्र, धर्म, न्याय या सर्वच क्षेत्रात आपण मागास व ज्येते शिकवतील तेच खरे ज्ञान अशी भावना समाज धुरीणींच्या मनात निर्माण होते व हेच विद्वान सामान्य जनांना भ्रमित करतात.

भारतातील विद्वान व नंतर राजकारणी व हळूहळू संपूर्ण समाज या आत्मवंचनेमुळे आत्मश्लाघेचा बळी ठरला.

I am Hindu by an accident अशी वाक्ये सहजपणे आमच्या नेतृत्वाच्या तोंडी येऊ लागली.
पण आमच्या दुर्दैवाने इंग्रज गेल्यावर सुध्दा मूलभूत चिंतन व मातीतून जन्मलेले तत्वज्ञान याचा अंगिकार न   झाल्याने व त्याच काळात भरात असलेले पण अत्यंत पोकळ व तकलादू तत्त्वज्ञान कम्युनिझम याचे ओझे विचारवंत व राजकारणी यांनी खांद्यावर घेतल्याने समाजाला ते मूलभूत काम ही काम स्वतः चे स्वतःच करावे लागले.

अनेक देशभक्त विद्वानांनी, अनेकविध अंगांनी हे ओझे झुगारून देण्याचे व मातीतील तत्वज्ञानाचे महानपण पुढे आणण्याचे  काम चालू ठेवले होते व या स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षात कधी पुसटपणे व नजीकच्या २५ वर्षात ठळकपणे याचे परीणाम सर्वत्र जाणवू  लागले.

योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्य वीर सावरकर, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ यशपाल, आर्य समाज, तसेच अनेक गणिती, विज्ञान अभ्यासक, व अर्थात या सर्व प्रयत्नांना स्वाभाविक शेवटापर्यंत आणणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या प्रयत्नातून आज ही एकात्मता वीण व सांस्कृतिक राष्ट्रवाद अधिक घट्ट होत आहे.

पण यातील सर्वांत मोठं व खर श्रेय काशीची गंगा रामेश्वरी वहाण्याचा धर्म नियम पाळणारा, चार धाम यात्रा करणारा, सांस्कृतिक भारत मनापासून समजलेला व जाणणारा हिंदू समाज याला जात.

पुढील लेखांमधून एकात्मतेसाठी व स्वत्व जागृती साठी झालेले पर्यत्न व यशस्वी वाटचाल.


सुनील देशपांडे.

Article (45/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन