स्वातंत्र्य लढ्यातील समस्या -- पराभूत मानसिकतेतील समाज.
लेखांक ४५*
स्वातंत्र्य लढ्यातील अनेक धुरीणींना पराभूत मानसिकतेतील आपला समाज ही स्वातंत्र्य प्राप्तीच्या लढ्यातील महत्वाची उणीव आहे हे जाणवत होते. ती घालवण्यासाठी काही तुटपुंजे प्रयत्नही चालू होते.
पण समाज विजिगीषु वृत्तीने उभा करणे ही स्वातंत्र्य लढ्याची पूर्व अट आहे हे फारसे कुणाला वाटले नाही. त्यामुळेच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खिलाफत चळवळ ही शुद्ध अराष्ट्रीय चळवळसुध्दा मांडीवर घेतली गेली. ज्या चळवळीला देश संक्लपनेचे अस्तित्वच मान्य नव्हते, ती चळवळ देशाच्या स्वातंत्र्यासाठी सहयोगी म्हणून स्विकारली गेली, एवढी कणाहीन मानसिकता हतबल समाज व त्याच्या पुढा-यांची झाली होती.
त्याच बरोबर मूळ उद्देश्याला प्रश्नांकित करतील अशा चळवळीपण काही नेतृत्वा कडून आंगिकारल्या गेल्या. जगातील सर्व समाजात काही ना काही दोष हे असतातच, तसे ते हिंदू समाज ही होते व आहेत.
पण ज्या संस्थेचा जन्म इंग्रजांशी संघर्ष यासाठी झाला, त्यांनी तेच काम करायला हवे होते, त्या ऐवजी, समाजातील दोष दूर करणे हे ही काम हाती घेतले. परीणामत: समाज विजिगिषु करणे हे मागे पडून आत्मश्लाघेचा बळी ठरला व त्यातही राष्ट्रीय समाज हिंदू हाच बळी गेला.
अशावेळी स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या पुस्तकाने हे पराभूततेचे भूत दूर पळविण्यास हातभार लावला.
*१८५७ चे स्वातंत्र्य समर.*
या पुस्तकाने बंड नव्हे युध्द हा भाव जागवला. आम्ही युध्द खेळलो हा भाव जागवला. १८५७ चे बंड हे बंड नव्हे तर देश स्वतंत्र करण्यासाठी केलेले स्वातंत्र्य समर होते या वीर सावरकरांच्या मांडणीने आत्मश्लाघेचे जू दूर करण्यासाठी मदत झाली. पुढील अनेक क्रांतिकारी वीरांना हा ग्रंथ प्रेरणा ठरला. भगवत गीता ठरला.
परीणामत: समाजाला आत्मभान आले. संपूर्ण देश एक आहे हे भाव जागरण या पुस्तकाने केले. ही एकात्मतेची वीण घट्ट करण्यातील महत्वाचं पाऊल ठरले.
असेच प्रयत्न पुढील लेखांमधून पाहू यात.
सुनील देशपांडे
Article (46/n)
Comments
Post a Comment