सांस्कृतिक राष्ट्रवाद व योगी अरविंद.

लेखांत ४६


इंग्रजांनी प्रयत्नपूर्वक सांस्कृतिक राष्ट्र संक्लपनेचे खच्चीकरण केलेले असल्याने पुरातन काळापासून येथे एक समृद्ध सांस्कृतिक जीवन सातत्यपूर्ण पणे चालू आहे हे सप्रमाण मांडून ती एक जैविक इकाई असते हे सिद्ध करणे अत्यंत आवश्यक होते व योगी अरविंद यांनी ते अत्यंत सुस्पष्ट शब्दात व शास्त्रीय परिभाषेत मांडले. या सांस्कृतिक राष्ट्राच्या सीमा, इतर राज्य ( state) संक्लपने प्रमाणे राजकिय बदलाप्रमाणे बदलण्या इतक्या तकलादू नसतात हे त्यांनी प्रभावीपणे मांडले
योगी अरविंद. आधुनिक भारतासाठी सांस्कृतिक राष्ट्रवादाची मूलभूत मांडणी केली.


राष्ट्र संक्लपना व त्याचे धर्म संस्कृती बरोबरचे नाते स्पष्ट केल्यामुळे हिंदू समाजाला आम्ही या मातृभूमीचे पुत्र आहोत व आमचे या मातेविषयी कर्तव्य आहे हा भाव जागा झाला. व एवढेच नव्हे तर आज कृत्रिम फाळणी नष्ट होईल हा विश्वास हिंदू समाजाला वाटतो त्याचे मूळही या चिंतनातच आहे.


१५ आॅगस्टच्या पूर्वसंध्येला हा भाव योगी अरविंद यांनी आशावाद म्हणून स्पष्ट केला होता. राष्ट्र हे एक जिवंत एकक आहे ही संक्लपना सनातन ज्ञानातून स्पष्ट केल्यामुळे, पारतंत्र्य ही तात्कालिक राजकीय घटना असून तिचा सांस्कृतिक राष्ट्रजीवनाच्या सातत्यपूर्ण प्रवाहावर काही परीणाम होत नाही हे देशाला समजले व राष्ट्रीय एकात्मतेची वीण अधिक घट्ट झाली व सामान्य माणसाला स्वातंत्र्य प्राप्ती साठी प्रयत्नशील होण्यास प्रेरणा मिळाली.

सर्व वेगळेपणातूनही समान सांस्कृतिक धागे हीच ती एकात्मता आहे हे योगी अरविंद यांनी समजावून सांगितले.

असेच राष्ट्रीय एकात्मता घट्ट करणारे व्यक्ति, विचार व संघटना व त्यांचा या शतकावरील प्रभाव पुढील लेखांमधून पाहू यात.


सुनील देशपांडे.
Article (47/n)

Photo courtesy Google.

Comments

  1. Chan lekh. Tyanchya konatya pustakat hevachayala milel he hi krupaya share karave.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन