बैठक: संघ कार्यपध्दती मधील यशाची गुरुकिल्ली.

लेखांक ३६* 


*संघ यशाची कारणमिमांसा*


संघ कार्यपध्दतीची आत्मा आपण पाहिला तो म्हणजे गटपट व्यवस्था. जेणेकरून संपूर्ण देशभर पसरलेल्या हिंदू समाजाला गवसणी घालण्याची योजना आखली गेली व ९५ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून ती यशस्वी करून दाखवली.

असाच अजून एक बारकावा आपण पाहू यात. संघ ही समुह भावना कशी निर्माण करतो. यात शाखा आहे, गटपट आहे, बौद्धिक वर्ग आहेत पण त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे संघातील सर्वांत भितीदायक शब्द बैठक.

कार्यक्रम ठरवण्यासाठी बैठक, तो घडवून आणण्यासाठी बैठक, तो संपल्यावर मूल्यमापनासाठी बैठक, श्रमपरीहार बैठक, कोण आले कोण नाही ठरवण्यासाठी बैठक.

इतकं काय आहे या बैठकीत.?
बैठकीचा हेतू आहे सामुदायिक चिंतनाची सवय लावणे. इतरत्र मिटींग्ज असतात. टार्गेट सांगणं व ते पूर्ण करण्यासाठी बैठक. संघातील बैठक असते विचार विनिमय करण्यासाठी. हा कार्यक्रम करावा का? कसा? कोणकोण काय काय करणार? हेतू काय? व. परस्पर विरोधी मतही येतात, त्यातील एखाद स्विकारल जात. कार्यक्रम ठरतो. यशस्वी झाला तरी सर्वांची वा वा, अयशस्वी झाला तरी सर्वांना बोचणी.

हे होण्यासाठी बैठकांचा भडीमार करून सामुहिक मनाची जडणघडण होते. निर्णय सामुहिक म्हणून यश १००%.

पण हे कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाही तर संघाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आहे. संघाचे उद्दीष्ट आहे संघटनेसाठी संघटना व खंडप्राय देशाला एकसूत्र करणे व विविधतेने नटलेल्या समाजात एकात्म सूत्र राखणे.

हे कधी घडेल?  ज्यावेळी विविध प्रकारचे, ठिकाणचे कार्यकर्ते सतत एकत्र येतील, विचार करतील, दुसर्याचे वेगळे वाटणारे विचार समजून घेतील, त्यातून मध्यम मार्ग काढतील त्यावेळी सर्व देशाचा विचार केला जाईल. व यासाठी समूह मन बनवलं पाहिजे. ते बनेल.

म्हणून बैठक.

या बैठकीतील अजून एक बारकावा म्हणजे परीचय सत्र. प्रत्येक बैठकीत परीचय हवाच. या मुळे ती आत्मियता, ती कुटुंब रचना, ती ओळख हे घडते. व त्यातून तुमचा कार्यक्रम ऐवजी आपला कार्यक्रम असे परीवर्तन होते.

हे आहे संघ बैठकीचे महत्व. व हा आहे कार्यपध्दती यशस्वी होण्यातील बारकावा. उद्दीष्ट यशस्वी का झाले, त्यातील एक कारण बैठक.

असेच अजूनही बारकावे पाहू पुढील भागात.

सुनील देशपांडे.

Article (37/n)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन